20 September 2020

News Flash

ग्रामीण भागातील मृत्यूंचे प्रमाण वाढते, औरंगाबादमध्ये ६७९ करोनाबळी

महापालिकेकडून चाचण्यांचा जोर कायम

संग्रहित छायाचित्र

महापालिकेकडून चाचण्यांचा जोर कायम

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील करोनाचा वाढता प्रकोप सुरूच आहे. शुक्रवारी संसर्ग पुन्हा वाढतच गेला. ग्रामीण भागातील मृत्यूचे प्रमाण वाढत आहे.  घाटीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या आठपैकी छावणी भागातील ४५ वर्षीय पुरुष व उल्कानगरी येथील ७८ वर्षांच्या दोघांचा मृत्यू झाला असून अन्य सहा जण ग्रामीण भाागातील आहेत. आतापर्यंत ६७९ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, करोना विषाणूची भीती न बाळगता मुखपट्टीही न वापरणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. बेदरकारपणाचे हे वागणे करोनाबाधितांची संख्याही वाढवेल आणि मृत्यूही वाढतील, असे आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत.

औरंगाबाद शहरातील करोना नियंत्रणासाठी चाचण्यांचा जोर मात्र महापालिकेने कायम ठेवला आहे. गर्दी करण्याचे टाळले नाही किंवा योग्य ती काळजी घेतली नाही तर विस्फोट होऊ शकतो, असा इशाराही दिला जात आहे. दरम्यान, मुखपट्टी न वापरणाऱ्या विरोधात दंड ठोठावण्याची मोहीमही अधिक गतिमान करण्यात आली आहे. मात्र, त्याकडे लक्ष दिले जात नाही. शहराभोवतालच्या गावामधून गंभीरपणे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण वाढत आहे. प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याची ओरड आता आरोग्य विभागात काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी करू लागले आहेत.

दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची संख्या आता ५०९ झाली आहे. शुक्रवारी मृत व्यक्तीमध्ये बीड जिल्ह्यातील रुग्णाचाही समावेश होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2020 12:53 am

Web Title: coronavirus in aurangabad 671 death in aurangabad due to coronavirus zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 सर्वकार्येषु सर्वदा : हक्काच्या निवाऱ्यासाठी ‘आरंभ’ला अर्थबळ हवे!
2 निधीच्या मुद्दय़ावर काँग्रेसमधील नाराज आमदारांच्या नावाचीच चर्चा
3 मारहाणीनंतर आत्महत्या; महिला पोलिसावर गुन्हा
Just Now!
X