22 October 2020

News Flash

करोनाचा विळखा, औरंगाबादमध्ये २७ जणांचा मृत्यू तर रुग्णांची संख्या ९५८

औंरगाबादमध्ये करोनाचा विळखा वाढतच चालला आहे.

संग्रहित छायाचित्र

औंरगाबादमध्ये करोनाचा विळखा वाढतच चालला आहे. शहरात आज, रविवारी ५७ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ९५८ झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.  शासकीय व वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) मागील चौदा तासांमध्ये दोन महिला आणि एक पुरूष अशा तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे आतापर्यंत २९ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे, असेही जिल्हा प्रशासनाने सांगितलेय.

करोनाबाधित असलेल्या ३५ वर्षीय महिलेचा आज सकाळी सहा वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच संजय नगरातील ५२ वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा १६ मे रोजी सायंकाळी सात वाजून ४५ ‍मिनिटांनी मृत्यू झाला. त्यांना उच्च रक्तदाब, दम्याचा त्रासही होता. तर जलाल कॉलनी येथील ३२ वर्षीय पुरूष रुग्णाचा १६ मे रोजी रात्री नऊ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला, असेही कळविण्यात आले आहे.


औरंगाबाद जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. औरंगाबाद शहरातील जालान नगर (1), उलकानगरी (1), रोहिदास हाऊसिंग सोसायटी (1), संजय नगर (1), सातारा परिसर (1), गणपती बाग, सातारा परिसर (6), विद्यानगर, सेव्हन हिल (1) , एन सहा,सिडको (1), पुंडलिक नगर (5), हुसेन कॉलनी (8), राम नगर (3), बहादूरपुरा (8), बारी कॉलनी, गल्ली नं. दोन (1), कबाडीपुरा, बुड्डीलेन (3), शरिफ कॉलनी (3), बाबर कॉलनी (3), सिंधी कॉलनी (1), न्याय नगर (1), न्याय नगर, दुर्गा माता कॉलनी (1),सिल्क मिल कॉलनी (1), घाटी (1), रेंटीपुरा (1), अन्य (2) तर कन्नड तालुक्यातील देवळाणा (2) या भागातील आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील 255 जण कोरोनामुक्त झाले आहेत, असेही कळवण्यात आलेले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2020 11:21 am

Web Title: coronavirus update aurngabad 958 coronavirus patient nck 90
Next Stories
1 Cornavirus : चिंताजनक..! औरंगाबाद @ ९००
2 Coronavirus : रुग्णसंख्या वाढतीच, बरे होण्याचेही प्रमाण अधिक
3 पीक रचनेत खरिपात मोठे बदल नसतील
Just Now!
X