औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील करोनाच्या रुग्णांची संख्या काहीशी आटोक्यात आली आहे. मे महिन्याच्या आठ दिवसांत सक्रिय रुग्णांची संख्या ४ हजार १७१ वरून २ हजार २०० वर आली.

शहरात १५ फेब्रुवारीपासून करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव जाणवू लागला. तिसऱ्या आठवडय़ात बाधित रुग्णांची संख्या हजारावर पोहचली. मार्च महिन्यात तब्बल ३२ हजार बाधित रुग्ण आढळून आले. करोनाची लाट झपाटय़ाने वाढत असल्यामुळे कोविड केअर सेंटरसह सरकारी व खासगी रुग्णालयातील खाटाही अपुऱ्या पडू लागल्या. एप्रिल महिन्यातही रुग्णसंख्या कमी न होताच वाढतच गेली. ४१ हजार रुग्णसंख्या झाल्यामुळे आरोग्य विभागही हैराण झाला. त्यातच प्राणवायू आणि रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवू लागला. दररोज हजार ते बाराशे रुग्णसंख्या आढळून येण्याची परिस्थिती एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ापासून ओसरू लागली.

शहरातील रुग्णसंख्या

१ मे                 ४८२

२ मे                 ३७३

३ मे                 ३२०

४ मे                 ३७४

५ मे                 ३८१

६ मे                 ३२८

७ मे                 ३५२

८ मे                 २८४