29 October 2020

News Flash

Coronavirus : मराठवाडय़ात करोनामुक्तीचे प्रमाण ८८ टक्के

मात्र मृत्युदरही चढाच

(संग्रहित छायाचित्र)

मात्र मृत्युदरही चढाच

औरंगाबाद : मराठवाडय़ातील औरंगाबाद शहरातील करोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८८ टक्क्यांवर पोहोचले असून ग्रामीण भागात हे प्रमाण ८४.५० एवढे झाले आहे.  पण मृत्यूचा दर नियंत्रण ठेवताना औषध उपलब्धता आणि ऑक्सिजन पुरवठा यासाठी गेल्या आठवडय़ापर्यंत कसरत करावी लागली. आता हा पुरवठा सुरळीत झाला आहे. आतापर्यंत मराठवाडय़ात एक लाख सात हजार ३०१ जणांना संसर्गाची लागण झाली असून  तीन हजार ६२ जणांचा मृत्यू झाला आहे.  औरंगाबाद शहरातील मृत्यूचा आकडा आता एक हजाराहून अधिक झाला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शनिवारी दुपापर्यंत चौघाजणांचा मृत्यू झाला.  यातील एक रुग्ण बुलढाणा जिल्ह्यातील असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

औरंगाबाद शहरात तसेच मराठवाडय़ातील आठ जिल्ह्यांत प्रत्येकी सरासरी २०० जणांना करोना विषाणूचा संसर्ग होतो. औरंगाबाद शहरातील रुग्णालयातील सुविधा अधिक असल्याने बुलढाणा, जळगावपासून मराठवाडय़ातील बीड, परभणी, जालना, हिंगोली व नांदेड जिल्ह्यातून रुग्ण दाखल होत आहेत.  त्यामुळे खासगी रुग्णालयात खाटा मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना वेगळाचा खटाटोप करावा लागतो आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन मिळविण्यासाठी ओळखी काढाव्या लागत आहेत. त्यामुळे लातूर, उस्मानाबाद, परभणी जिल्ह्यात चढय़ा भावाने इंजेक्शन विक्री होत असल्याच्या तक्रारी रोज येत आहेत.  दरम्यान औरंगाबाद शहरातील संसर्ग काहीसा आटोक्यात आल्याचे चित्र दिसत आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ८८ टक्के असल्याने बाजारपेठांमधील गर्दी वाढू लागली आहे.  उस्मानाबाद, परभणी या जिल्ह्यातील करोनाबाधित मृत्यूचा दर अधिक असल्याचे सातत्याने दिसून येत आहे.

उस्मानाबाद जिल्ह्याचा दर ३.१० एवढा असून परभणीचा ४.२४ एवढा आहे. मृत्यू दर कमी ठेवण्यात हिंगोली जिल्ह्यास साथ रोगाच्या पहिल्या दिवसापासून यश मिळाले आहे. या जिल्ह्यात करोन संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे प्रमाण अजून २१.१२ असल्याचा प्रशासनाचा दावा आहे.  गृहविलगीकरण आणि संस्थात्मक अलिकरणात असलेल्या व्यक्तींवरही प्रशासनाची नजर असल्याने संसर्ग आटोक्यात असल्याचा दावा केला जात आहे.

जिल्हानिहाय मृत्युसंख्या

औरंगाबाद- ९५२, नांदेड- ४३६ , परभणी- २३४, लातूर-५०५, जालना-२२४, बीड- २८६, हिंगोली-३८, उस्मानाबाद-३८७

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2020 12:01 am

Web Title: covid 19 recovery rate 88 percent in marathwada zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांचे ‘सर्वपक्षीय सौहार्द’!
2 ऊसतोड कामगारांच्या नेतृत्वासाठी संघर्ष
3 ‘तीन चाकी’ रुतलेलीच!
Just Now!
X