शिव-पार्वतीच्या सुंदर शिल्पात ऊस काढलेला असेल तर अर्थ काय घ्यायचा? त्यांच्या आयुष्यातला गोडवा शिल्पकाराला सांगायचा असतो. अभिव्यक्ती प्रतिकांच्या रुपाने उभी ठाकते, तेव्हा त्यास नव्या जाणिवा मिळतात. अशी काही नव्या संवेदनेची सुनील देवरे यांची शिल्पे आबुधाबी येथे १२ ते २० जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शनात मांडली जाणार आहेत.
एक मूर्ती हेलकावे खात असेल तर कशी दिसेल? सुनील देवरेंच्या मते बघणाऱ्या डोळ्यांमधील ते हेलकावे पकडता यावेत, असे शिल्प करायचे होते. प्रतिमा हलली की त्या वस्तू दोन दिसू लागतात, असा नावाडी त्यांनी उभा केला. डोळ्याच्या खाली आणखी दोन डोळे, चेहऱ्यावर लाटा झेलण्याचे सामथ्र्य उभे करणाऱ्या देवरे यांनी आतापर्यंत अनेक प्रदर्शनात सहभाग नोंदवला. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या मूर्तिकामाची प्रशंसा होत आहे. दोन प्राणी एकमेकांमध्ये तादात्म पावतील, अशी काही शिल्पेही त्यांनी तयार केली आहेत.
हंस आणि महिला, हत्ती आणि बल अशी शिल्पे नवे काही सांगू पाहणारी. पाऊस हा तर अनेक कलाकारांच्या अभिव्यक्तीचा केंद्रिबदू. देवरेंना मान्सून कसा दिसतो याचे एक शिल्प त्यांनी तरुणीतून उभे केले. नखशिखांत भिजलेली मूर्ती तयार करणे तसे अवघड काम. दगड-मातींतून व्यक्त होताना किती वेळ जातो आणि हे कसे होते याचे उत्तर शब्दांत देता येत नाही. मात्र, ते म्हणतात, कला कोणतीही असो, किमान १० हजार तास सातत्याने प्रामाणिकपणे काम होत नाही तोपर्यंत त्याचे परिणाम पाहावयास मिळत नाहीत. सन २००० मध्ये देवरेंनी शिल्पकाम करण्यास सुरुवात केली. अनेक देशात त्यांच्या कामाची प्रशंसा होत आहे.
देवरेंचे वडील पुरातत्त्व विभागात मूर्ती संवर्धन विभागात कार्यरत होते. साहजिकच वेरुळमधील मूर्तीची कलात्मकता बघत ते लहानाचे मोठे झाले. कसलेला कलाकार आणि त्याचा सहायक यांनी केलेले काम यातील फरक तेथे पाहावयास मिळाला. येथे या कलेची व्यक्त-अव्यक्त होण्याची भाषा कळाल्याचे ते सांगतात. व्यक्त होताना कलाकार नेहमी दोन बाबी जोडतो. माणसाच्या शरीराला गजमुख आणि त्यातून निर्माण झालेला सर्वाचा लाडका गणपती असो किंवा अन्य शिल्पे त्यातून शिल्पकार व्यक्त होत असतो. रंग भरून चित्र रंगविणे आणि शिल्प घडविणे यांतील शिल्पांची त्रिमिती ज्याला कळते तो अधिक नीटपणे व्यक्त होतो. असे काही शिल्प नव्याने तयार करताना वर्षभरात १०-१२ मूर्तीचे काम होऊ शकते. तसे पुतळे उभे करणे ही कारागिरी झाली. मात्र, शिल्प घडविता येणारी सर्जनशीलता सुचावी लागते. ती प्रक्रिया अन्य कलांसारखीच आहे, असेही देवरे सांगतात. या वर्षी इंग्लंडमध्येही त्यांची शिल्पे एका प्रदर्शनात ठेवली जाणार आहेत.

Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!
political parties candidates celebrated rang panchami
रंग जल्लोष रामाचा अन् प्रणितीचा..
rupali chakankar jitendra awhad
“रुपाली चाकणकरांच्या बुद्धीची कीव येते”, सुप्रिया सुळेंवरील ‘त्या’ टीकेला आव्हाडांचं उत्तर; म्हणाले, “बुरसटलेले विचार…”
sanjay raut raj thackeray amit shah
“राज ठाकरेंची खंत फक्त मलाच माहिती”, अमित शाहांच्या भेटीवर संजय राऊतांची खोचक टिप्पणी; ‘त्या’ व्हिडीओचा केला उल्लेख