News Flash

दरोडय़ाच्या तयारीत असणाऱ्या चौघांना अटक

अंधाराचा फायदा घेऊन दोघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले.

शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बाजूला अंधारात लपून दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या चौघा जणांना पोलिसांनी अटक केली. अंधाराचा फायदा घेऊन दोघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले. अटक केलेल्या व्यक्तींकडून चाकू, पितळी धातूचे फायटर, मोबाइल, लोखंडी गज, नायलॉन दोरी, तिखट जप्त करण्यात आले.

शासकीय अभियांत्रिकीच्या बाजूला काही जण अंधारात लपून बसले असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अमित बागूल यांना मिळाली. रात्री एक वाजता कर्मचाऱ्यांसह चारही बाजूने प्रकाश टाकला व दरोडेखोरांना पकडले. सरवर शहा मनोहर शहा (वय ३७, रा. रहमानिया कॉलनी), मनोज ऊर्फ जनार्दन मोरे (वय २५, रा. ब्रिजवाडी), देवा सुभाष चंद्रशेखर (वय २३, रा. शाहूनगर, केडगाव, अहमदनगर), रवि रमेश गायकवाड (वय २७, रा. ब्रिजवाडी) या चौघांना अटक करण्यात आली. अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेल्या दोघा जणांची नावे पोलिसांना समजली असून, कलीम खान व गुरमुख या दोघांनाही लवकरच अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2016 1:26 am

Web Title: crime in aurangabad
Next Stories
1 रिक्षाचालकांकडून होणारी लूट थांबणार
2 सिद्धार्थ उद्यानातील रेणू बिबटय़ाची दोन्ही पिल्ले दगावली
3 ‘सनातन’ वर बंदी घालण्याची काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची मागणी
Just Now!
X