03 March 2021

News Flash

अन् चोरटे दानपेटीसह झाले फरार

पोलिसांच्या रिकाम्या फिक्सपाॅईंट समोरुन दानपेटी पळवली

प्रतिकात्मक छायाचित्र

औरंगाबाद – शहराचे ग्रामदैवंत संस्थान गणपतीची दानपेटी रेकाॅर्डवरच्या दोन गुन्हेगारांनी रविवारी पहाटे ५च्या सुमारास पोलिसांच्या रिकाम्या फिक्सपाॅईंट समोरुन उचलून नेली. या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.गुन्हेशाखेने तत्परतेने CCTV फुटेज वरुन गुन्ह्यात वापरलेला रिक्षा जप्त केला. पण चोरटे दानपेटीसहित फरार आहेत.

सकाळी ७ वा. हा प्रकार उघडकीस आला आहे. पुजारी ओंकार दिक्षीत पुजा करण्यासाठी गेले असता त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. चोरीचा प्रकार मंदीराच्या सी.सी. टि.व्ही. फुटेज मधे कैद झाला आहे. फिक्स पाॅईंटवर असलेला कर्मचारी रोज पहाटे ४वा. निघून जातो. यावर चोरट्यांनी पाळंत ठेवून दानपेटी लांबवली. गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी चोरट्यांच्या कुटुंबियिंना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांना आरोपींची नावे निष्पन्न झाली असून ते ताब्यात येई पर्यंत जाहिर करण्याचे टाळंत आहोत.असा खुलासा पोलिस निरीक्षक सावंत यांनी केला

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2018 7:16 pm

Web Title: crime in aurngabad
Next Stories
1 सर्व धर्मांचा आदर राखण्याचे संस्कार आजाेबांनी केले – आदित्य ठाकरे
2 शंभरीपारचे ‘मत’वाले वाढले
3 राज्यात टँकरच्या दरात मोठी वाढ
Just Now!
X