30 May 2020

News Flash

अंध पतीचा खून करून पेटवले

अंध अशरफ यांना पहाटे झोपेतच उचलून आणत खून केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता.

प्रतिनिधिक छायाचित्र

पोलीस तपासात पत्नी, प्रियकराचे कृत्य उघड

औरंगाबाद : वैजापूरजवळील तिडी शिवारात एका अंध व्यक्तीचा खून करून मृतदेह पेट्रोलने पेटवून दिल्याचे प्रकरण गुरुवारी उघडकीस आल्यानंतर ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने काही तासांमध्ये आरोपींचा छडा लावला. पकडलेल्या शेख यासिन शेख वसीर (रा. कसाबखेडा) याने गुन्ह्य़ाची कबुली दिली. मृत अंध सय्यद अशरफ सय्यद नूर याच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगत शेख यासिनने मृत हा अडसर ठरत असल्यानेच त्याचा खून केल्याचे मान्य केले, असे ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी माध्यमांना सांगितले.

तिडी-सवंदगाव रस्त्यावरील रघुनाथ डुकरे यांच्या शेतात गुरुवारी सकाळी सय्यद अशरफ यांचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. या घटनंनतर वैजापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनंत कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक भागवत फुंदे यांच्यासह श्वान पथक, ठसे तज्ज्ञही घटनास्थळी दाखल झाले होते. या वेळी पोलिसांनी घटनास्थळावरून लोखंडी गज, अंधाची काठी, काडेपेटी आणि पेट्रोलची रिकामी बाटली जप्त केली होती. अंध अशरफ यांना पहाटे झोपेतच उचलून आणत खून केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2020 2:18 am

Web Title: crime news blind husband murder fire police crime branch akp 94
Next Stories
1 मिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत
2 …गालबोट लावण्याचा प्रयत्न केला, तर गाठ माझ्याशी आहे; सुप्रिया सुळेंनी दिला दम
3 मिरवणुकीत तरुणाचा खून; एकाला अटक
Just Now!
X