हैदराबाद बँकेच्या सहा शाखांमध्ये मंजूर झालेल्या २८ कोटी ७६ लक्ष रुपये पीकविम्यापकी तब्बल ६ कोटी रुपयांचा पीकविमा बनावट असल्याचे उघडकीस आले आहे. जिल्हा बँक बोगस पीकविम्याचे माहेरघर ठरलेले असताना राष्ट्रीय बँकांमध्येही एकाच क्षेत्रावर अनेक वेळा पीकविमा भरल्याचे तपासणीत समोर आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर एका क्षेत्रावरील एक वेळच पीकविमा देण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या पाच शाखांमध्ये सहा कोटी रुपयांचा पीकविमा घोटाळा समोर आला असून इतरही राष्ट्रीयीकृत बँकांच्या तपासणीत हा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे.

बीड जिल्ह्यात मागच्या वर्षीच्या खरीप हंगाम पिकासाठी तब्बल ९०० कोटी रुपयांचा पीकविमा मंजूर झाला. जिल्हा बँकेत ६०० कोटी रुपये, तर राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये ३०० कोटी रुपये विमा आल्यानंतर या विम्यामध्ये मोठय़ा प्रमाणात गडबड असल्याची तक्रार झाली. जिल्हा बँकेत तर एकाच शेतकऱ्याने एकाच क्षेत्रावरचा तब्बल चाळीस वेळा विमा हप्ता भरला. इतर तालुक्यातही विमा हप्ता भरून मोठय़ा प्रमाणात रक्कम मंजूर करून घेण्याचा प्रयत्न केला. जवळपास २०० कोटी रुपये जास्तीचे मंजूर करून घेण्यात आल्याचा आरोप झाल्यानंतर जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी सर्व बँकांना आदेश देऊन एकाच क्षेत्रावर एकाच वेळी मंजूर पीकविमा वाटप करण्याचे आदेश दिले.

Onion auction closed for 11 days in nashik
कांदा लिलाव ११ दिवसांपासून बंद; नाशिकमध्ये एक लाख क्विंटलची खरेदी-विक्री ठप्प
Property worth lakhs was robbed in two house burglaries in nashik
नाशिक : जिल्ह्यात दोन घरफोडींमध्ये लाखोंचा मुद्देमाल लंपास
Mild earthquake tremors in Akola district
अकोला जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य हादरे
Water scarcity in Jalgaon district
निम्म्या जळगाव जिल्ह्यात टंचाईचे संकट; ३१ गावांना ३५ टँकरद्वारे पाणी

मंजूर पीकविम्याच्या रकमेत एकापेक्षा जास्त वेळा नाव येणाऱ्या शेतकऱ्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या सहा शाखांमधून पीकविम्यापोटी आलेल्या २८ कोटी ७६ लाख रुपयांपकी ६ कोटी बोगस असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले.

यात घाटनांदूर शाखेत ४ कोटी ९६ लाख, अंबाजोगाई शाखेत २७ लाख १८ हजार, परळी शाखेत २७ लाख ५८ हजार, धारूर शाखेत तीन लाख, पाटोदा शाखेत २ लाख ६४ हजार, तर मांजरसुंबा शाखेत ५ लाख १७ हजार रुपये याप्रमाणे जवळपास ६ कोटी रुपये पीकविमा बोगस असल्याचे दिसून आले.

जिल्हा बँकेत तर मोठय़ा प्रमाणात बोगसगिरी झाली असून त्याची चौकशी सुरू आहे. इतर राष्ट्रीयीकृत बँकांमध्येही मोठय़ा प्रमाणावर बोगसगिरी झाली असून चौकशीत तेही स्पष्ट होईल, असे अ‍ॅड. अजित देशमुख यांनी सांगितले आहे.