21 November 2019

News Flash

बीबी का मकबऱ्यासमोर आंदोलन

तटावरून पडलेल्या कामगाराचे मृत्यूप्रकरण

बीबी का मकबरा संग्रहित छायाचित्र

तटावरून पडलेल्या कामगाराचे मृत्यूप्रकरण

औरंगाबाद : बीबी का मकबऱ्याच्या तटावरून पडून कामगार छोटुलाल जगन पानबिसरे (वय ५०) यांचा सोमवारी दुपारी मृत्यू झाला. मंगळवारी मृत छोटुलाल यांच्या नातेवाइकांनी मंगळवारी बीबी का मकबरासमोर मदतीसाठी आंदोलन केले.

बेगमपुरा पोलिसांच्या माहितीनुसार मृत छोटुलाल पानबिसरे हे इटखेडा येथील रहिवासी होते. ते मकबऱ्याच्या बाहेरील भिंतीवरील काम करीत होते. त्यांचा अचानक तोल गेल्याने ते पंधरा ते वीस फुट खाली कोसळले. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. मृत छोटुलाल यांच्या कुटुंबीयांना पुरातत्त्व विभागाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करीत नातेवाइकांनी मंगळवारी सकाळपासून बीबी का मकबऱ्यासमोर ठिय्या आंदोलन केले. महापौर नंदकुमार घोडेले यांनी मृत छोटुलाल यांच्या नातेवाइकांची भेट घेतली. याबाबत महापौर घोडेले यांनी सांगितले, की मृत छोटुलाल पानबिसरे हे आपल्या वॉर्डातील होते म्हणून आपण त्यांच्या नातेवाइकांची भेट घेण्यासाठी आलो आहोत. दरम्यान, मृत छोटुलाल यांच्या मुलाला नोकरीचे देण्याचे आश्वासन पुरातत्त्व विभागाकडून मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

First Published on June 19, 2019 2:10 am

Web Title: dead worker family protest at bibi ka maqbara
Just Now!
X