उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील धानोरा (शे) इथं दोन दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. बप्पासाहेब नानासाहेब शेळके असे अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर इतर दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना सोलापूर इथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सोमवारी संध्याकाळी आठच्या दरम्यान कळंब-येडशी रस्त्यावर ही दुर्घटना घडली. मृत बप्पासाहेब शेळके हे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य होते.

कळंब तालुक्यातील शेळका धानोरा येथील बप्पासाहेब शेळके कळंबवरून दुचाकीवरून शेळका धानोरा इथे जात होते. याच दरम्यान मंगरूळ पाटीजवळ येडशीवरून तांदुळवाडीकडे जात असलेल्या दुचाकीशी समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघात दोन्ही दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झाले. जखमीना त्वरीत कळंब येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी बप्पासाहेब शेळके यांना मृत घोषित केले. तर इतर जखमींना प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूरला हालवण्यात आले आहे. मित्राची दुचाकी घेऊन बप्पासाहेब शेळके तालुक्याला गेले होते. तेथून परतत असताना ही दुर्घटना घडली.

akola, after 3 months of victim death, Murder Case Registered, Akot Police Sub Inspector, murder case in akola, murder case, victim death, victim torture by police, crime news, akola news, marathi news,
पोलिसाच्या अमानुष मारहाणीत आरोपीचा मृत्यू; तीन महिन्यांनी गुन्हा दाखल
13 year old school boy dies after drowning in private swimming pool
पुणे: खासगी जलतरण तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी
sangli crime news, cloroform for md drugs marathi news
सांगली: तासगाव तालुक्यातील शेतात ११ लाखांचे द्रवरुप क्लोरोफार्म जप्त, एमडीसाठीचा कच्च्या मालाचा साठा