20 November 2017

News Flash

पँथर सेनेच्या कार्यकर्त्यांकडून सावेंच्या कार्यालयावर हल्ला

दीनदयाळ उपाध्याय पुण्यतिथी कार्यक्रमानंतर वेगळे वळण

प्रतिनिधी, औरंगाबाद | Updated: March 21, 2017 5:48 PM

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

दीनदयाळ उपाध्याय पुण्यतिथी कार्यक्रमानंतर वेगळे वळण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शनिवारी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त घेण्यात आलेल्या डॉ. अशोक मोडक यांचे व्याख्यान उधळण्याच्या घटनेने गुरुवारी नवे वळण घेतले. बुधवारी व्याख्यान उधळणाऱ्या विद्यार्थी संघटनेवर कारवाई करण्याचे निवेदन औरंगाबाद पूर्व भाजपचे आमदार अतुल सावे यांनी कुलगुरुंना दिल्यानंतर गुरुवारी काही पँथर्स सेनेच्या कार्यकर्त्यांनी आमदार सावे यांच्या कार्यालयावर दुपारी २.३०च्या सुमारास दगडफेक केली. ‘सावे मुर्दाबाद’ अशा घोषणा देऊन दगडफेक करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सिडको पोलीस ठाणे गाठून अटक करवून घेतली.

आमदार अतुल सावे यांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी सचिन सत्तु तिवारी (वय ३२), राहुल श्रीराम घेवांदे (वय ३१), किरण रमेश तुपे (वय २३), विशाल गोपीनाथ नवगिरे, दीपक चंद्रभान केदार यांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

विद्यापीठात शनिवारी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त डॉ. अशोक मोडक यांचे व्याख्यान आयोजित केले होते. हा कार्यक्रम संघाची विचारसरणी रुजवण्याचा आरोप करीत बहुजन क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. मोडक यांच्या व्याख्यानाला तीव्र विरोध केला. मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना विरोध करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी व्याख्यानस्थळी दाखल झाले. त्यांनी व्याख्यानाच्या बाजूने भूमिका घेतली. त्यानंतर विद्यापीठात दोन्ही संघटनांमध्ये वाद विकोपाला गेला. विद्यापीठातील सभागृहातील साहित्याची मोडतोड झाली. विद्यापीठाकडून सुरक्षा अधिकारी सुरेश परदेशी यांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. बहुजन मोर्चाचे सचिन िशदे यांनीही अभाविपसह भाजयुमोच्या कार्यकत्रे, पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दिली. सोमवारी व मंगळवारी विद्यापीठ आवारात अभाविप, भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी निदर्शने केली.

बुधवारी विद्यापीठाकडून पत्रकार बठक घेऊन गोंधळ घालणाऱ्यांविरोधात कडक भूमिका घेण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर अभाविपकडून घेतलेल्या पत्रकार बठकीत व्याख्यान उधळण्यामागे राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांचा हात असल्याचा आरोप केला होता. त्याचदरम्यान औरंगाबाद पूर्वचे भाजपचे आमदार अतुल सावे यांनी कुलगुरुंची भेट घेऊन डॉ. मोडक यांच्या व्याख्यानात अडथळे आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन दिले.

भाजप पदाधिकाऱ्यांना संरक्षण

या घटनेविषयी बोलताना आमदार अतुल सावे यांनी सांगितले की, कार्यक्रम उधळणाऱ्या कार्यकर्त्यांनी डॉ. मोडक यांचे व्याख्यान ऐकायला पाहिजे होते. परंतु तसे न करता नाहकच राग मनात धरून कार्यालयावर दगडफेक केली. आमच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट सायंकाळी भेट घेतल्याचे आमदार सावे यांनी सांगितले. दरम्यान औरंगाबाद शहरातील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना पोलीस संरक्षण देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

First Published on February 17, 2017 12:34 am

Web Title: deendayal upadhyaya