News Flash

कुलसचिवपदाची सूत्रे दिलीप भरड यांच्याकडे

कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी ही नियुक्ती केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिवपदी आस्थापना विभागाचे उपकुलसचिव दिलीप भरड यांची नियुक्ती करण्यात आली. डॉ. मुरलीधर लोखंडे यांच्याकडून मंगळवारी सायंकाळी त्यांनी पदभार स्वीकारला. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी ही नियुक्ती केली.

भरड गेल्या ११ वर्षांपासून उपकुलसचिव, सहायक कुलसचिव, कक्षाधिकारी, कुलसचिवांचे स्वीय सहायक आदी पदांवर कार्यरत आहेत. भारतीय नाविक दलात १५ वष्रे त्यांनी सेवा केली. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात तीन वषेर्ं कक्षाधिकारी म्हणून त्यांनी काम केले. डॉ. लोखंडे यांनी कुलसचिवपदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. सहायक कुलसचिव गुलाब नागे हे आस्थापना विभागात कार्यरत असणार आहेत. सामान्य प्रशासन, गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्था कार्यालय अतिरिक्त पदभार कक्षाधिकारी भगवान फड यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. डॉ. कैलास पाथ्रीकर, पर्वत कासुरे, विष्णू कऱ्हाळे, दीपक पाटील, स्मिता चावरे, संजय कवडे, प्रकाश आकडे आदींनी भरड यांचे अभिनंदन केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2016 2:07 am

Web Title: dilip barad selected as secretary of dr babasaheb ambedkar marathwada university
Next Stories
1 आमदार निधीतील कामासाठी ८२ रुपये, तर लोकसहभागातून १५.५० रुपये दर
2 महिलांची २० लाखांची फसवणूक
3 ‘हर्सूल तलावातील गाळउपशाची चौकशी करा’
Just Now!
X