News Flash

औरंगाबादच्या दिशा जोशीची राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

महाराष्ट्र कराटे असोशिएशनकडून निवड

दिशा गिरीष जोशी

औरंगाबाद येथील दिशा गिरीष जोशी हिची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात १७ वर्षाखालील गटात निवड झाली आहे. महाराष्ट्र कराटे असोशिएशनकडून ही निवड करण्यात आली. ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान दिल्लीत राष्ट्रीय तलकोटरा मैदानावर ही कराटे स्पर्धा पार पडणार आहे.

औरंगाबाद : आपल्या शिक्षक आणि मार्गदर्शकांसह दिशा जोशी.

औरंगाबाद येथील सेंट झेवियर्स शाळेत इयत्ता नववीच्या वर्गात दिशा शिकत असून तिचे वडील एका खासगी कंपनीत काम करत आहेत. औरंगाबाद येथील सेल्फ डिफेन्स कराटे अकॅडमीचे बळीराम राठोड यांच्याकडून दिशाला कराटेचे प्रशिक्षण मिळाले. औरंगाबादसारख्या भागातून दिल्ली येथे होणाऱ्या कराटे स्पर्धेत खेळण्यासाठी दिशाची निवड होणे हे इतर मुलींसाठीही प्रेरणादायी आहे. महिला सक्षमीकरणासाठी शाळा महाविद्यालयात मुलींसाठी कराटेचे प्रशिक्षण दिले जाते. अशा स्पर्धांमुळे त्यामधील मुलींचा सहभाग वाढण्यास मदत होईल असे राठोड म्हणाले.

दिशाला कराटेची खूप आवड आहे. त्यासाठी ती प्रचंड मेहनत घेत आहे, तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होणे गौरवास्पद आहे, अशा शब्दांत मुलीची निवड झाल्यामुळे दिशाच्या आई-वडिलांनी आनंद व्यक्त केला. मुलगा-मुलगी भेद न करता त्यांच्या आवडी पालकांनी जपायला हव्यात असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे. गिरीष जोशी आणि शुभांगी जोशी यांची दिशा एकुलती एक मुलगी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2018 3:32 pm

Web Title: disha joshi from aurangabad selected for national championship of karate at delhi
Next Stories
1 पत्नीचा खून क रून पतीची आत्महत्या
2 ‘कुली’ची पंतप्रधानांना ६५५ ट्विट..!
3 औरंगाबादमध्ये ‘पद्मावत’साठी चित्रपटगृहांना पोलिसांचा वेढा
Just Now!
X