श्रीक्षेत्र भगवानगडावरील दसरा मेळाव्यावरून निर्माण झालेल्या वादावर महंत नामदेवशास्त्री आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले आहे, असे गडाचे सचिव गोिवद घोळवे यांनी म्हटले आहे.
दसरा मेळाव्याची परंपरा कायम राहिली पाहिजे, अशीच आपली भूमिका आहे. गडाच्या सचिवपदाचा जून महिन्यातच राजीनामा दिला. महंत नामदेवशास्त्री यांनी गड एका समाज व पक्षापुरता मर्यादित होऊ नये, यासाठी राजकीय भाषणबाजी बंद करण्याचा निर्णय घेतला. यानंतर काही उत्साही लोक महंतांसह माझ्यावरही टीका करीत आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर मंत्री पंकजा मुंडे सक्षम नेतृत्व करीत असल्याचे मतही त्यांनी रविवारी व्यक्त केले.
संत भगवानबाबा यांनी स्थापन केलेल्या भगवानगडावर दरवर्षी होणारा दसरा मेळावा गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीमुळे चच्रेत आला, मात्र मागील काही दिवसांत गडावर एकाने स्वत:ला जाळून घेतले, महंतांविरुद्ध गुन्हा दाखल झाला, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर दगडफेक झाली या घटनांमुळे धार्मिक गडाबाबत चुकीचा संदेश जात असल्याने महंत नामदेवशास्त्री यांनी गडावरून राजकीय भाषणबाजी बंद करण्याची भूमिका जाहीर केली. या पाश्र्वभूमीवर महंत नामदेवशास्त्री, पंकजा मुंडे यांची बठक घेऊन तोडगा काढू. घरातले भांडण आहे. लवकरच मिटेल असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.