पाच एकांकिकांचे सादरीकरण

औरंगाबाद : औरंगाबादच्या नाटय़क्षेत्रातील मंडळींना उत्सुकता असणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिके’ची विभागीय अंतिम फेरी मंगळवारी दुपारी २ वाजता तापडिया नाटय़गृहात सुरू होणार आहे. विविध विषयांवरील एकांकिकांचे सादरीकरण झाल्यानंतर पाच एकांकिकांची निवड विभागीय अंतिम फेरीसाठी करण्यात आली होती.

औरंगाबाद विभागीय अंतिम फेरीसाठी सरस्वती भुवनच्या नाटय़शास्त्र विभागाची ‘काळोखाचा रंग कोणता?’ नगर येथील न्यू आर्ट कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजची ‘अंत्यकथा’, सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय औरंगाबादची ‘शाम-ए-प्रतीक्षा’, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाटय़शास्त्र विभागाची ‘कसरत’ तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ललित कला विभागाची ‘रक्षक’, या एकांकिका सादर होणार आहेत. मान्यवर परीक्षकांच्या उपस्थितीत मंगळवारी सादरीकरणानंतर निकाल घोषित होतील. त्यानंतर औरंगाबाद विभागातून एक एकांकिका महाअंतिम फेरीसाठी निवडली जाईल.

नाटय़ क्षेत्रातील विविध कलागुणांसाठी स्वतंत्र पारितोषिकेही दिली जाणार आहेत.

प्रायोजक

लोकसत्ता आयोजित ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत लोकांकिका स्पर्धा ‘अस्तित्त्व’च्या सहकार्याने पार पडणार आहे. ‘इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड’, ‘कमांडर वॉटर टेक प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘एम. के. घारे ज्वेलर्स’ पावर्ड बाय असलेल्या या स्पर्धेसाठी ‘मे.बी.जी चितळे डेअरी’ आणि ‘झी टॉकीज’ असोसिएट पार्टनर आहेत. ‘झी टॉकीज’ या उपक्रमासाठी प्रक्षेपण भागीदार देखील आहे. लोकांकिकेच्या मंचावरील कलाकारांच्या कलागुणांना चित्रपट मालिकेत संधी देणारे ‘आयरिस प्रॉडक्शन’ टॅलेंट पार्टनर आहेत.