|| सुहास सरदेशमुख
प्रा. वेदालंकारांकडून तीन हजार ओव्या अनुवादाचे काम पूर्ण

औरंगाबाद:  ‘ओम नमोची आज्ञा’ या ज्ञानेश्वरीच्या आद्य अक्षरापासून ते पसायदानापर्यंत नऊ हजार ओव्या. ओवी म्हणजे चार-चार चरणाचा एक छंद. त्याला वर्णाक्षर मर्यादेचे तसे नियम नाहीत. गझल बांधलेली असते. ओवीच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणात अंत्यानुप्रास. वारकरी संप्रदायात रसाळ ज्ञानेश्वरीची पारायणे केल्यानंतरही ‘एक तरी ओवी अनुभवावी’ हे शिल्लक राहतेच. पण मराठीतील हा ठेवा अन्य भाषेतही उपलब्ध व्हावा म्हणून म्हणून प्राध्यापक वेदकुमार वेदालंकार यांनी ज्ञानेश्वरीचा अनुवाद करण्याचे ठरविले आणि चार हजार ओवींचा अनुवाद पूर्ण झाला आहे. या पूर्वी त्यांनी संत तुकारामाच्या अभंगांचाही पद्यानुवाद केला होता. मराठी भाषेतील अनेक गाजलेल्या पुस्तकांना हिंदी भाषकांपर्यंत पोहोचविण्याचे काम प्रा. वेदालंकार यांनी केले आहे. त्यांनी आतापर्यंत मराठीतील श्रीमान योगी, पाचोळा, महात्मा फुले यांच्या समग्र वाङ्मयही हिंदी भाषेत अनुवादित केले आहे.

गणेशाच्या वर्णनाने सुरू होणाऱ्या ज्ञानेश्वरीचे पहिले तीन-चार अध्याय तसे लहान आहेत. पण त्याचा अनुवाद करताना त्याचे भाव जगणे अधिक उन्नत करत होते. आता ओवी अनुभवता येणे ही प्रक्रिया असली, तरी भाषिक अर्थाने ती अन्य भाषकांपर्यंत पोहोचावी म्हणून त्याचा अनुवाद करण्याचा निर्णय घेतल्याचे प्राध्यापक वेदालंकार सांगतात. रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात प्राचार्य म्हणून निवृत्तीनंतर भाषा अनुवादाच्या क्षेत्रात प्रा. वेदालंकार यांनी मोठे योगदान दिले आहे. बनारस विश्वविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या वेदालंकार यांचे हिंदी, संस्कृत, मराठी भाषेवर प्रभुत्व असून त्यांनी महात्मा फुले यांच्या अखंडाचाही पद्यानुवाद केला असून तो राज्य सरकारकडून प्रकाशाधीन आहे. संत गोरा कुंभार, संत चोखामेळा अशा नऊ संतांच्या ६५० अभंगांचा अनुवाद केला आहे. चोहा, चौपाई, गीत आदी छंदात अनुवाद त्यांनी केला आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने हिंदी साहित्य अकादमीच्या वतीने गजानन माधव मुक्तिबोध पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. पुणे येथील गुरुकुल प्रतिष्ठान, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अनुवादाच्या पुरस्कारासह अनेक पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत. नवनव्या पुस्तकाचे वाचन करताना मराठी संत साहित्य हिंदीमध्ये घेऊन जाण्याचे त्याचे कार्य मौलिक मानले जाते. आता ज्ञानेश्वरीही हिंदी भाषकांपर्यंत पोहचणार आहे. ‘ऐसे अक्षरे मिळविन की अमृताशी पैजा जिंके’ असा मराठी भाषेचा मान उंचावणाऱ्या संत ज्ञानेश्वराचा आद्यग्रंथ आता हिंदीमध्ये अनुवादित होत आहे.

ram navami, shobha yatra, akola, vishwa hindu parishad, ram navami in akola, ram navami shobha yatra, ram navami vishwa hindu parishad, marathi news, ram navami news, akola news,
अकोला : रामनवमीनिमित्त राजराजेश्वरनगरी भगवामय; शोभायात्रेची ३८ वर्षांची परंपरा
balmaifal, symbol of revolution, dr ambedkar balmaifal
बालमैफल: क्रांतीचे प्रतीक
Martand Sun Temple
काश्मीरमधल्या मार्तंड सूर्य मंदिराचा होणार जिर्णोद्धार, अयोध्येतील राम मंदिराशी आहे थेट कनेक्शन
history of bhang on holi
होळीच्या दिवशी भांग पिण्याला आहे विशेष धार्मिक महत्त्व; जाणून घ्या या परंपरेमागील पौराणिक कथा

एरवी अन्य लेखकांच्या साहित्याचा अनुवाद करताना फारसे शब्द अडायचे असे कधी घडायचे नाही. पण ज्ञानेश्वरी हा मुळात चिंतनाचा भाग आहे. त्यामुळे तसा हा अनुवाद अवघड आहे पण जमून येतो आहे. आतापर्यंत ४० पुस्तके प्रकाशित झाल्यानंतरही हे अनुवादाचे काम करताना नवा आनंद मिळतो आहे. -प्रा. वेदकुमार वेदालंकार