19 October 2019

News Flash

काँग्रेसला सव्वाशे कोटींवर दलाली दिल्याची इटलीत कागदपत्रे

भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित लक्ष्य-२०१९ या कार्यशाळेत ते बोलत होते.

(संग्रहित छायाचित्र)

ऑगस्टा वेस्टलॅंड गैरव्यवहारप्रकणी मुख्यमंत्री फडणवीस यांचा आरोप

ऑगस्टा वेस्टलॅंड गैरव्यवहाराचे प्रकरणात अडचणीत येऊ शकतो हे लक्षात आल्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी राफेल प्रकरणात नुसताच आवाज करत उपयोग करून घेतला. १२५ कोटी रुपयांपेक्षा अधिकची दलाली काँग्रेस पक्षाला दिली गेली असल्याची कागदपत्रे इटालीच्या न्यायालयातील पत्रव्यवहारात दिसून येतात. या प्रकरणातील दलाल ख्रिस्तियान मिशेल याला संरक्षण व्यवहारातील इत्थंभूत माहिती पोहोचवली जात होती. ही माहिती पोहोचवणाऱ्यांनीच दलाली केली असल्याचा घणाघाती आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित लक्ष्य-२०१९ या कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यक्रमास भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, संघटनमंत्री विजय पुराणिक, भाजप युमोचे प्रदेशाध्यक्ष योगेश तिळेकर, आमदार संतोष दानवे आदींची उपस्थिती होती.

तीन राज्यातील पराभवाची मीमांसा करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आकडय़ांच्या भाषेत कदाचित मध्यप्रदेशात पराभव दिसू शकेल. परिस्थिती अशी नाही. लोकसभा निवडणुकीत या तिन्ही राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर लोक विश्वास ठेवतील. राफेलमध्ये जणू भ्रष्टाचार झाला असेल, असे भासवून जे हवेत उडताहेत त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने उत्तर मिळाले आहे.

राफेल व्यवहारात मध्यस्थ असणार नाही, अशी भूमिका घेत भारत आणि फ्रान्स सरकारने केलेल्या करारानुसार आणि संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने ठरवलेल्या किमतीपेक्षा कमी किमतीत ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. केवळ रिलायन्स नाही तर अन्यही कंपन्यांना राफेल उत्पादक फ्रेन्स कंपनीला काम दिले होते. त्यामुळे काँग्रेसच दलाली घेणारे आहेत. त्यांनी बोफोर्समध्येही दलाली घेतली. संरक्षणाचा सौदा केला. त्यांना मातृभू्मी वगैरे काही माहिती नाही. पैसा प्रिय आहे. काँग्रेसच दलाल आहे, असेही ते म्हणाले.

औरंगाबाद येथे भारतीय युवा मोर्चाच्या विजय लक्ष्य-२०१९ या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. मंचावर रावसाहेब दानवे, भाजयुमोचे योगेश तिळेकर आदी राफेलप्रकरणातील वस्तुस्थिती मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने राज्यात शंभर सभा घेण्यात येतील, असे भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष योगेश तिळेकर यांनी सांगितले.

First Published on January 4, 2019 1:53 am

Web Title: documents in italy that have given the congress a brokerage of 200 billion