02 March 2021

News Flash

डीएसके घोटाळ्यातील महाराष्ट्र बँकेचा हिस्सा ९७ कोटींचा

बँकेची रक्कम सुरक्षित असल्याचा कर्मचारी संघटनेचा दावा

बँकेची रक्कम सुरक्षित असल्याचा कर्मचारी संघटनेचा दावा

‘डीएसके’ घोटाळ्याचा आकडा २०४२ कोटींचा असल्याचा दावा अंमलबजावणी संचालनालयाने दोषारोपपत्रात केला असला तरी सर्व बँकांनी मात्र डी. एस. कुलकर्णी यांना केवळ ६९८ कोटी ५० लाख रुपयांचा कर्जपुरवठा केला होता. त्यातील केवळ १० कोटी रुपयांचे कर्ज अटकेत असणारे तत्कालीन बँकेचे व्यवस्थापक रवींद्र मराठे यांच्या कार्यकाळात मंजूर झाले होते. त्यामुळे मराठे यांच्यावर केलेली कारवाई बँक अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण करणारे असल्याचे ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन व बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशन या दोन संघटनांनी म्हटले आहे. महाराष्ट्र बँकेने डीएसके उद्योगसमूहाला केवळ ९७.१२ कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. मार्चमध्येच डीएसकेचे खाते थकबाकीदारांच्या यादीत टाकून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. १२६ मालमत्ता, २७६ बँक खाती आणि ४६ वाहनांवर टाच आणण्यात आली. त्यातील बहुतांश मालमत्ता बँक ऑफ महाराष्ट्रच्या ताब्यात असल्याने व्याजासह बँकेची रक्कम सुरक्षित असल्याचा दावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

बँकेच्या अध्यक्षांना अटक करण्यासह अंमलबजावणी संचालनालयाने केलेली कारवाई ही अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रावर गदा आणणारी आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खच्चीकरण करून  अन्य बँकांमध्ये सुरू असणाऱ्या कोटय़वधी रुपयांच्या घोळांकडे दुर्लक्ष व्हावे, असा या कारवाईचा हेतू तर नाही ना, असा प्रश्न ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनचे सरचिटणीस देवीदास तुळजापूरकर यांनी उपस्थित केला आहे. व्हिडीओकॉन प्रकरणात सुनंदा कोचर यांना केवळ सक्तीच्या रजेवर पाठविले जाते आणि बँक ऑफ महाराष्ट्रच्या अध्यक्षांना अटक होते, हा विरोधाभास असल्याचे सांगण्यात येत आहे. पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळा मोठा असूनही या बँकेच्या अध्यक्षांची चक्क केंद्रीय समितीवर निवड होते, याकडेही बँक ऑफ महाराष्ट्रमधील अधिकारी लक्ष वेधत आहेत. सार्वजनिक बँक क्षेत्रातील प्रामाणिक बँक अधिकाऱ्यांच्या पाठीशी कर्मचाऱ्यांची युनियन उभी राहील, असे तुळजापूरकर यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2018 1:15 am

Web Title: dsk scam bank of maharashtra
Next Stories
1 सावकारी पाश सैल होतोय..!
2 शेततळ्यांच्या योजनेत मराठवाडा आरंभशूर!
3 शेतीसाठी पदर खोचून उभ्या ‘चारचौघी’!
Just Now!
X