करोना विषाणूने चीनमध्ये थमान घातल्यानंतर तेथून भारतात येणाऱ्या मालाची आयातही मंदावली आहे. कूलर तयार करण्यासाठी लागणारी मोटार आदी यंत्रसामग्री मिळवण्यासाठी येथील उद्योजकांना कसरत करावी लागत असून जादा पसा द्यावा लागत आहे. परिणामी कूलरच्या दरातही ३०० ते ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. तर पत्र्याच्या दरात इंधनवाढ कारणीभूत असल्याचे व्यावसायिक सांगत आहेत.

कूलरसाठी पत्रा, लोखंडी अँगल, तारांची जाळी, गवतसदृश माल, पंखा, इलेक्ट्रिक वायर, खटके, आदींसह पंप, पाईप आणि पंखा फिरवणारी मोटार आदी साहित्य आवश्यक असते. यातील मोटार व त्याची वाइंिडग ही चीनमधून भारतात आयात केली जाते. मात्र, हा माल सध्या भारतात आयात करण्याची प्रक्रिया मंदावली आहे. त्यामुळे मोटार वेळेत उपलब्ध होत नाही. १५ ते २० दिवसांपासून मोटार, वाइंिडगच्या मालासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. शिवाय त्याच्या दरातही ३०० ते ५०० रुपयांपर्यंत वाढ  झालेली आहे. परिणामी  वाढलेला खर्च विक्रेता हा ग्राहकांच्या खिशातून काढतो. त्यामुळे दरवाढ  झालेली आहे, असे मोंढय़ाजवळील आठवडी बाजार परिसरातील व्यावसायिक मोहम्मद अझहर यांनी सांगितले.

पत्रा व लोखंडाच्या अँगलमध्येही दरवाढ झाली आहे. ही दरवाढ स्थानिक पातळीवरील इंधनवाढीसह इतर कारणांशी संबंधित आहे. कूलरसाठी लागणारा पत्रा गतवर्षी ५० रुपये किलोने खरेदी केला जायचा. आता लहान व्यापाऱ्यांना एक किलो पत्र्यासाठी ७५ रुपये मोजावे लागत आहेत, असे दुधाचे कॅन, कूलरचा सांगाडा तयार करणारे दिवाण देवडी भागातील फहीमभाई यांनी सांगितले.