30 November 2020

News Flash

पक्ष बदनामी थांबविण्यासाठी राजीनामा दिला – खडसे

४० वर्षांच्या राजकीय आयुष्यातील हा दुर्दैवी प्रसंग आहे. केलेल्या आरोपात कोणतेही तथ्य नाही.

एकनाथ खडसे यांनी आपली पत्नी मंदाकिनी आणि जावई गिरीश चौधरी यांच्या नावे एमआयडीसीची तीन एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला.

पक्ष बदनामी थांबविण्यासाठी आपण स्वत:च राजीनामा दिला असून चौकशीतून आपण निष्कलंक असल्याचे सिद्ध होईल, असे उत्तर राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी तुळजापुरात दिले.

४० वर्षांच्या राजकीय आयुष्यातील हा दुर्दैवी प्रसंग आहे. केलेल्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. त्यामुळे आपण फौजदारी गुन्हे दाखल करून आरोप करणाऱ्यांना उत्तर दिले आहे. या प्रकरणाची नि:पक्षपातीपणे चौकशी होण्यास आपले सहकार्य असून यातून लवकरच निष्कलंक सिद्ध होऊन बाहेर पडू, असे सांगून पक्ष बदनामी थांबविण्यासाठी आपण स्वत: राजीनामा दिला असल्याचे खडसे यांनी सांगितले.

भाजपा नेते एकनाथ खडसे, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, त्यांच्या पत्नी सविता फुंडकर, आमदार आकाश फुंडकर यांनी शुक्रवारी सायंकाळी तुळजाभवानीचे दर्शन घेतले. पुजारी विकास मलबा यांनी त्यांची देवीपूजा केली. दर्शनानंतर मंदिर संस्थानच्या वतीने उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण यांनी देवीची प्रतिमा देऊन सत्कार केला. या प्रसंगी आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, अ‍ॅड. अनिल काळे, तालुकाध्यक्ष सत्यवान सुरवसे आदी उपस्थित होते.

या वेळी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण या पदाचा उपयोग करू. शेतकऱ्याला सुखी करण्याचा प्रयत्न करू असे सांगून आपण एकनाथ खडसेंचा पर्याय होऊ शकत नाही. ते पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो, असे सांगितले. तसेच आम्ही दोघे एकमेकांचे नेते आहोत. कोणीही एकमेकांचा पर्याय नाही, असा खुलासा या वेळी मिश्कीलपणे माजी मंत्री खडसे यांनी केला. गुलचंद व्यवहारे यांनी या वेळी देवीची प्रतिमा, कवडय़ाची माळ घालून त्यांचा सत्कार केला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2016 2:12 am

Web Title: eknath khadse explanation about resignation
Next Stories
1 रा. स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुरेशराव केतकर यांचे निधन
2 पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ कारखान्याचा गाळप परवाना रद्द
3 पीक विमा पैशाअभावी बँक रक्कम लुटण्याचा प्रयत्न
Just Now!
X