औरंगाबादमधील सेव्हन हिल विद्यानगर परिसरात बनावट नोटा विक्री करणार्‍या दोघांना सापळा लावून पुंडलीक नगर पोलिसांनीअटक केली. तर एकाला आझाद चौक सिडको येथून पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मदतीने अटक करण्यात आली.त्यांच्या ताब्यातून बोगस १२ हजार ४०० रु.,प्रिंटर, कागद असा ८६ हजार ८०० रु.चा ऐवज जप्त केला. या प्रकरणातील एक आरोपी नाशिक मधे असल्यामुळे पोलिसांचे एक पथक नाशिक कडे रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख समरान रशिद (२४) रा. नेहरुनगर सैय्यद सैफ सय्यद असफ(२४),रा. नेहरु नगर  आणि सय्यद सलीम सय्यद मोहम्मदयार (२२).रा. रांजणगाव शेणपुंजी अशी अटक आरोपींची नावे आहेत.गेल्या तीन महिन्यांपासून शहरात जिन्सी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बनावट नोटा तयार करण्याचे उद्योग सुरु होते.गुरुवारी दुपारी साडेतीन वा. एपीआय घन्नशाम सोनवणे यांनी विद्यानगरात सापळा लावला होता. शेवटी रात्री ८.४५ वा.सय्यद सैफ हा दुचाकीवर विद्यानगरात आला. त्या ठिकाणी सय्यद सलीम ला १००रु. दराच्या नोटा देतांना एपीआय सोनवणे यांनी दोघांना ताब्यात घेत अटक केली. सैफ ने जप्त केलेल्या नोटा आझाद चौकातील शे.समरान रषिद कडून घेतल्याचे सांगितले.