01 October 2020

News Flash

तीन लहान मुलांना विहिरीत फेकून पित्याची आत्महत्या

कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी हाताला काम मिळत नसल्याने कंटाळलेल्या पित्याने स्वत:च्या तीन लहान मुलांना विहिरीत फेकले व नंतर स्वत:ही विहिरीत उडी घेतली.

कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी हाताला काम मिळत नसल्याने कंटाळलेल्या पित्याने स्वत:च्या तीन लहान मुलांना विहिरीत फेकले व नंतर स्वत:ही विहिरीत उडी घेतली. यात दोन मुलांसह पित्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर सुदैवानेच दहा वर्षांची मुलगी बचावली. जिल्ह्य़ातील कडोळी (तालुका सेनगाव) येथे शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास हा दुर्दैवी प्रकार घडला.
कडोळी येथील महेंद्र बळीराम गुडदे हा शेतमजूर हाताला काम नसल्याने घरसंसार कसा चालवावा, या विवंचनेत होता. त्यातूनच दुपारी गोरेगाव शिवारातील ज्ञानबा खिल्लारी यांच्या शेतात असलेल्या विहिरीत मुलगा जय (वय ७), सुमित (वय ४) व भारती (वय १०) या तिघांना विहिरीत फेकले व स्वत: विहिरीत उडी घेतली. भारतीने विहिरीत पंपाच्या पाईपला पकडून धरल्यामुळेच ती बचावली. तिने आरडाओरड केल्यामुळेच शेतातील लोक धावले. मात्र, तोपर्यंत जय व सुमित, तसेच महेंद्र गुडदे या तिघांचा पाण्यात बुडाल्यामुळे मृत्यू झाला होता. गोरेगाव पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. मृतदेह वर काढून सायंकाळी उशिरा रितसर पंचनामा करण्याचे काम चालू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2015 1:40 am

Web Title: father suicide after three childs throw in well
Next Stories
1 ‘एक गाव एक गणपती’ संकल्पनेला ग्रामीण भागात प्रतिसाद
2 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मुस्लिम समुदायाचा आधार
3 पावसाची इतरत्र कृपावृष्टी; उस्मानाबादेत कोरडेठाक!
Just Now!
X