14 October 2019

News Flash

औरंगाबादमध्ये लाकडी गोदामाला आग

शेंद्रा एमआयडीसीत स्कोडा कंपनीजवळ लाकडी गोदाम आहे. या गोदामात सोमवारी दुपारी भीषण आग लागली.

औरंगाबादमध्ये लाकडी गोदामाला सोमवारी दुपारी भीषण आग लागली असून या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे आठ बंब घटनास्थळी पोहोचले आहेत.

शेंद्रा एमआयडीसीत स्कोडा कंपनीजवळ लाकडी गोदाम आहे. या गोदामात सोमवारी दुपारी भीषण आग लागली. लाकडामुळे आग वेगाने पसरत गेली आणि आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे आठ बंब घटनास्थळी पोहोचले आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीमुळे गोदामालगतच्या जालना महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामार्गावरील वाहतूक अन्य मार्गांवर वळवण्यात आली आहे.

भिवंडीतील काल्हेर येथील जय भवानी कम्पाऊंड येथील एका कंपनीलाही सोमवारी सकाळी आग लागली. एका ब्रश कंपनीत ही आग लागली. आग इतकी भीषण होती की लगतच्या गोदामांचेही आगीत नुकसान झाले. या आगीवर दुपारपर्यंत नियंत्रण मिळवण्यात यश आले नव्हते.

First Published on April 22, 2019 5:15 pm

Web Title: fire at aurangabad shendra midc bhiwandi kalher godown no casualties