News Flash

महिलेच्या खुनातील आरोपीच्या नातेवाइकांची घरे पेटवली

शेतातून घरी येणाऱ्या महिलेचा निर्घृण खून केल्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी उघडकीस आला. पोलिसांनी बुधवारी पहाटे गावात नातेवाइकाकडे आलेला सुनील अर्जुन बरडे या तरुणाला अटक केली.

शेतातून घरी येणाऱ्या महिलेचा निर्घृण खून केल्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी उघडकीस आला. पोलिसांनी बुधवारी पहाटे गावात नातेवाइकाकडे आलेला सुनील अर्जुन बरडे या तरुणाला अटक केली. सकाळी मृत महिलेचा अंत्यविधी झाल्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी आरोपीच्या नातेवाइकांची घरे पेटवून दिली. यात दोन घरे जळून खाक झाली. गावात तणावाचे वातावरण असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
पाटोदा तालुक्यातील पारगाव घुमरा येथील मीरा घुमरे (वय ४५) या महिलेचा विवस्त्रावस्थेतील मृतदेह मंगळवारी सायंकाळी आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी गावात नातेवाइकाकडे आलेला आणि पळून गेलेला सुनील बरडे या युवकाला पहाटेच्या सुमारास ताब्यात घेतले. सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर या महिलेचा अंत्यविधी झाला. यानंतर संतप्त गावकऱ्यांनी आरोपीच्या नातेवाइकांची घरे पेटवून दिली. यात दोन घरे खाक झाली. रात्रीच दोन्ही कुटुंबांतील लोक गावातून पसार झाले. त्यामुळे अनर्थ टळला. या प्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. उपअधीक्षक, तहसीलदार यांच्यासह गावात मोठा बंदोबस्त तनात करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 11, 2016 1:40 am

Web Title: fire of house in womens murder case
टॅग : Beed,Fire,House
Next Stories
1 विभागीय आयुक्तालयावर अपंगांच्या प्रश्नांबाबत मोर्चा
2 दारिद्रयरेषेखालील व्यक्तींसाठी ७०० रुपये एमआरआय शुल्क
3 हवेमध्ये जलवाहिनी उभारून कळंबवासीयांना पाणीपुरवठा
Just Now!
X