News Flash

औरंगाबादचे पहिले पाच संघ जाहीर ; विभागीय अंतिम फेरी ६ ऑक्टोबरला

लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेच्या विभागीय अंतिम फेरीसाठी औरंगाबाद विभागातून ५ संघ बुधवारी निवडण्यात आले.

लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेच्या विभागीय अंतिम फेरीसाठी औरंगाबाद विभागातून ५ संघ बुधवारी निवडण्यात आले. डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नृत्यशास्त्र विभागाची ‘भक्षक’, नाटय़शास्त्र विभागाची ‘देवदासी’, बीडच्या एस. के. एस. महाविद्यालयाची ‘भोग’, तसेच जळगावच्या जेठा महाविद्यालयाची ‘साधूच्या डोहात’ व रायसोनी इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटच्या ‘आसुसलेला दोरखंड’ या एकांकिका या फेरीत दाखल झाल्या. त्यांचे सादरीकरण ६ ऑक्टोबरला होईल.
सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत व पृथ्वी एडिफिस यांच्या सहकार्याने आयोजित लोकसत्ता-लोकांकिका स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी स्पर्धकांमध्ये दांडगा उत्साह होता. प्राथमिक फेरीत एकूण १५ एकांकिका सादर झाल्या. मंगळवारी मराठवाडा व खान्देशातून आलेल्या ८ संघांनी एकांकिका सादर केल्या. सतत पडणारा दुष्काळ, लैंगिक विकृतीचे प्रश्न, त्यात महिलांची फरपट, अंधश्रद्धा यासह नातेसंबंधांवर प्रकाश टाकणाऱ्या संहिता विद्यार्थ्यांनी हाताळल्या.
परीक्षक अमेय उज्ज्वल व पद्मनाभ पाठक यांनी केलेल्या परीक्षणानुसार ५ संघांची निवड जाहीर झाली. ‘लोकसत्ता’चे मुख्य वितरण व्यवस्थापक मुकुंद कानिटकर, मुख्य जाहिरात व्यवस्थापक संदीप ऋषी, आयरिस प्रॉडक्शन हाऊसचे अभय परळकर यांची या वेळी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2015 4:34 am

Web Title: first five teams declared from aurangabad in loksatta lokankika event
टॅग : Loksatta Lokankika
Next Stories
1 ‘सनातनच्या आश्रमांवर छापे टाकून आठवलेंना अटक करा’
2 शेतकरी संघटनेची मराठवाडा दुष्काळी परिषद
3 मराठवाडय़ातील कारखान्यांचे गळीत हंगाम १ नोव्हेंबरपासून
Just Now!
X