22 November 2019

News Flash

परभणी जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी

दिवसेंदिवस उन्हाच्या तडाख्यामुळे तापमानाचा पारा चढतच चालला असून रविवारी जिल्ह्यात जिंतुर तालुक्यात उष्माघाताचा पहिला बळी गेला. केमापूर शिवारात ही घटना घडली.

यंदाचे वर्ष हे सर्वात उष्ण वर्षांपैकी एक ठरणार असून गेला नोव्हेंबर महिना हा गेल्या १३६ वर्षांतला सर्वात उष्ण ठरला आहे.

दिवसेंदिवस उन्हाच्या तडाख्यामुळे तापमानाचा पारा चढतच चालला असून रविवारी जिल्ह्यात जिंतुर तालुक्यात उष्माघाताचा पहिला बळी गेला. केमापूर शिवारात ही घटना घडली.
तालुक्यातील चारठाणा पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या मौजे केमापूर शिवारात उष्माघाताचा एक बळी गेला. सेलू तालुक्यातील वालूर येथून शेगावला जाण्यासाठी पायी िदडी निघाली असून मानवत तालुक्यातील मौजे मंगरुळ येथील रहिवासी असलेले प्रकाश अंबादास देशमुख (वय ५५) हे िदडीमध्ये शेगावला जात होते. त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने ते केमापूर शिवारात एका झाडाखाली थांबले. िदडी पुढे निघून गेली. याच ठिकाणी झाडाखाली प्रकाश देशमुख यांचे निधन झाले. याबाबत केमापूरच्या गावकऱ्यांनी चारठाणा पोलिसांना माहिती दिली असता सहायक पोलीस निरीक्षक सुनील पुंगळे व जमादार देवकर घटनास्थळी पोहोचले.

First Published on April 12, 2016 1:30 am

Web Title: first victim in parbhani district of high temperature
टॅग Parbhani
Just Now!
X