08 March 2021

News Flash

औरंगाबादमध्ये तलाव दिसल्यानंतर झाला पोहण्याचा मोह, पाच मित्र पाण्यात उतरले पण त्यानंतर…

कोबी काढण्यासाठी आले होते तरुण

औरंगाबादमध्ये तलावात पोहण्यासाठी उतरण्याचा मोह पाच तरुणांच्या जीवावर बेतला. यामध्ये तीन भावंडांचाही समावेश आहे. हे तरुण कोबी काढण्यासाठी आले होते. परत जाताना नाथनगर तलाव येथे आंघोळ करण्यासाठी ते तलावात उतरले. यावेळी दुर्दैवाने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भालगाव येथेल राहणारे हे तरुण कोबी काढण्यासाठी वरझडी तालुका औरंगाबाद येथे गेले होते. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास भालगाव येथे परतत असताना नाथनगर तलाव येथे आंघोळ करण्यासाठी थांबले. तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने पाचही जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने पाचही मृतदेह पाण्याच्या बाहेर काढून घाटी दवाखाना औरंगाबाद येथे पाठविण्यात आले. मृतांमध्ये तीन भावंडांचा समावेश आहे.

मृतांची नावे –
1) समीर शेख मुबारक (१७)
2) शेख अन्सार शेख सत्तारा (१७)
3) आतीक युसुफ शेख (१८)
4) तालेब युसुफ शेख (२१)
5) सोहेल युसुफ शेख (१६)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2020 8:12 pm

Web Title: five youngsters drown in pond in aurangabad sgy 87
Next Stories
1 करोनाग्रस्त आरोपीने रुग्णालयातूनच ठोकली धुम; जिल्हा व पोलीस प्रशासनाची उडाली झोप
2 औरंगाबाद विभागाची बारावीनंतर दहावी निकालातही घसरण
3 आम्ही धावतच राहणार..!
Just Now!
X