रा. स्व. संघ, जनकल्याण समितीच्या वतीने जळकोट तालुक्यातील होकर्णा गावी जिल्हय़ातील दुसऱ्या चारा वितरण केंद्राची सुरुवात करण्यात आली.
या चारा वितरण केंद्रासाठी गावकऱ्यांचा २५ टक्के लोकसहभाग व ७५ टक्के खर्च रा. स्व. संघ, जनकल्याण समितीच्या वतीने करण्यात येतो. जिल्हय़ातील पहिले चारा वितरण केंद्र अहमदपूर तालुक्यातील सोनखेड येथे सुरू करण्यात आले. त्यानंतर रविवारी रा. स्व. संघ, जनकल्याण समितीचे कार्यवाह वसंतराव नायगावकर यांच्या हस्ते होकर्णा येथे चारा वितरण केंद्रास सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी अशोक शिवणे, डॉ. व्यंकटेश जोशी, अॅड. मनोज जाधव, विलास आराध्ये व विनोद खरे उपस्थित होते. १९७२ च्या दुष्काळात रा. स्व. संघाच्या वतीने दुष्काळ विमोचन समिती या नावाने मदतीचे काम करण्यात आले. त्यानंतर जनकल्याण समितीच्या कामाची सुरुवात झाली. होकर्णा गावचे सरपंच दिगंबर पाटील व शेतकरी मारुती देवकते यांनी चारा वितरण केंद्राच्या उपक्रमाबद्दल आभार मानले.