21 February 2020

News Flash

बलात्कार-खूनप्रकरणी औशामध्ये चौघे ताब्यात

औसा तालुक्यातील गोंद्री येथील अकरावीमध्ये शिकणाऱ्या दलित समाजातील अल्पवयीन मुलीचा मृतदेह शुक्रवारी विहिरीत आढळला.

औसा तालुक्यातील गोंद्री येथील अकरावीमध्ये शिकणाऱ्या दलित समाजातील अल्पवयीन मुलीचा मृतदेह शुक्रवारी विहिरीत आढळला. मुलीवर बलात्कार करून खून करण्यात आल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला. शनिवारी शवविच्छेदन झाल्यानंतर औसा पोलीस ठाण्यात बलात्कार व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
बुधवारी (दि. ३०) ही मुलगी महाविद्यालयातून लोदग्याहून घराकडे येत असताना वाटेत तिला गाठून काहींनी गरकृत्य केले. तिने घरी गेल्यानंतर आपल्या आईला घडल्या प्रकाराची माहिती व आरोपींची नावेही सांगितली. आईने सकाळी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देऊ, असे तिला समजावले. त्याच रात्री लघुशंकेस जाण्याचे कारण सांगून मुलगी घराबाहेर पडली व गायब झाली. दुसऱ्या दिवशी तिची आई पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेली असता पोलिसांनी नातेवाइकांकडे शोधा, असे सांगून तक्रार घेण्यास नकार दिला. शुक्रवारी या मुलीचा मृतदेह गावातील विहिरीत आढळून आला. तिच्या शरीरावर अनेक जखमा होत्या व तिचा चेहरा जाळण्याचा प्रयत्न केला असल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे. लातूर येथील रुग्णालयात शनिवारी दुपारी शवविच्छेदन करण्यात आले. तिच्यावर अत्याचार करणाऱ्या सर्व आरोपींना ताब्यात घेतल्याशिवाय मुलीचा मृतदेह घेण्यास पालकांनी नकार दिला. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता.

First Published on October 4, 2015 1:30 am

Web Title: four arrested in rape and murder case
Next Stories
1 परभणीत विजांचे तांडव सुरूच; दोन मुलींसह चार महिलांचा मृत्यू
2 रिपाइंच्या वर्धापनदिनात ‘नाराजी’सह शक्तिप्रदर्शन!
3 औरंगाबाद-वर्ध्यातील दोन गावे ‘नाम’कडून दत्तक
X