News Flash

भरधाव कारची रिक्षाला धडक; चार जण ठार

एकावर उपचार सुरू

(सांकेतिक छायाचित्र)

भरधाव कारने रिक्षाला दिलेल्या धडकेत चार जण जागीच ठार झाले आहेत. औरंगाबाद-जालना मार्गावर हा भीषण अपघात झाला. मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. मृत चौघेही रिक्षातून प्रवास करत होते. यातील एका जखमीवर औरंगाबादमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचार सुरू आहे.

औरंगाबाद जालना रोडवर आणखी एक भीषण अपघात झाला. बुधवारी सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास जालना येथून निघालेला रिक्षा औरंगाबादच्या दिशेने जात होता. शेकटा शिवारातील अमृतसर पेट्रोलपंप समोरून जात असताना त्याच वेळी विरूद्ध दिशेने भरधाव वेगाने येणारी कारदुभाजकावरून येऊन रिक्षावर वेगाने धडकली. या अपघातात रिक्षातील सर्व प्रवाशी जागीच ठार झाले. तर यात एक जण जखमी झाला. ही माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. जखमीवर सध्या घाटीत उपचार सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2019 4:01 pm

Web Title: four killed in car auto accident bmh 90
Next Stories
1 चोरीच्या तक्रारीत करमाड पोलिसांची चलाखी उघड
2 भाजपची भूमिका दुटप्पीपणाची ! आमदार अंबादास दानवे यांचा आरोप
3 औरंगाबाद शहराचा ‘स्मार्ट’ चेहरा बकालच!
Just Now!
X