19 October 2019

News Flash

चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार, आरोपी फरार

धक्कादायक घटना

(संग्रहित छायाचित्र)

औरंगाबाद येथील सिडको परिसरात चार वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या बाबात सिडको पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

के.जी मध्ये शिकणाऱ्या चार वर्षाच्या चिमुरडीवर शुक्रवारी हा प्रसंग ओढावला. शाळेतून घरी आल्यानंतर दुपारी मुलीने जेवण केले आणि लगेच झोपली. सायंकाळी उठल्यानंतर मुलीला चालताना त्रास होऊ लागला म्हणून आईने डॉक्टरांकडे नेहले. डॉक्टरांनी तिच्यासोबत अतिप्रसंग झाल्याचे आईला सांगितले. डॉक्टरांचे शब्द ऐकताच मुलीच्या आईला धक्का बसला. मानसिकदृष्ट्या खच्चीकरण झाले. शेजाऱ्यांनी प्रसंगावधान पाहून पोलिस स्टेशनमध्ये सर्व घटना सांगितली. अखेर पहाटे पोलिसांनी अज्ञांताविरोधात दुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी पुढील तपास करत आहेत

First Published on January 6, 2019 11:56 am

Web Title: four year old girl raped in aurngabad