10 April 2020

News Flash

सिल्लोडमधील महिलेवर सामूहिक बलात्कार

घटना ही १४ डिसेंबर रोजीची असल्याचे पीडितेचे म्हणणे आहे.

(संग्रहित छायाचित्र)

सिल्लोड शहरातील एका तीस वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याप्रकरणी रविवारी केशव जाधव व विशाल निकम या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक बोडक यांनी दिली.

या संदर्भातील माहिती देताना उपविभागीय पोलीस अधिकारी मुंडे यांनी सांगितले की, पीडित महिला घरात एकटी पाहून काही तरुणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार ५ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आली आहे. घटना ही १४ डिसेंबर रोजीची असल्याचे पीडितेचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी केली. त्यानंतर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये अद्याप कोणालाही अटक  करण्यात  आली  नसल्याचे  मुंडे यांनी  सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2020 1:18 am

Web Title: gang rape of a woman in a sillod abn 97
Next Stories
1 भांडणातून भावाला पेटवले
2 ‘स्वाभिमानी’ आता महापालिका निवडणुकीच्या आखाडय़ात
3 ‘पानगळ’ लांबली
Just Now!
X