News Flash

गिरीश कुबेर यांना स. मा. गग्रे पुरस्कार

मंत्री शरद पवार यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण

‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर

इतिहास संशोधक, संपादक स. मा. गग्रे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दिला जाणारा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार या वर्षी अर्थशास्त्राचे अभ्यासक, दैनिक ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांना जाहीर झाला आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण सोमवार, १६ जानेवारी रोजी बीड येथे होणार आहे.

बीड जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने मागील दहा वर्षांपासून जिल्ह्यचे सुपुत्र  स. मा. गग्रे यांच्या नावाने दरवर्षी राज्यातील एका ज्येष्ठ पत्रकाराला पुरस्कार देऊन गौरविले जाते. या वर्षीच्या पुरस्कारासाठी कुबेर यांची निवड करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी १० वाजता बीड येथे यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे.

या वेळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार रजनी पाटील, खासदार प्रीतम मुंडे, माजी मंत्री सुरेश धस यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पत्रकार संघाचे संस्थापक संतोष मानूरकर व वसंत मुंडे यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2017 12:54 am

Web Title: girish kuber
Next Stories
1 सरकारचे शेतीविरोधी धोरण बदलायला हवे
2 केंद्रीय उत्पादन शुल्कात नोटबंदीनंतर वाढ
3 अंतर्गत बंडाळीमुळे सर्वच पक्ष त्रस्त
Just Now!
X