27 September 2020

News Flash

बेरोजगार तरुणांना वस्तू-सेवाकराचा फटका!

एसटी भाडय़ाची जुळवणीही अवघड असलेल्या दूर्गम भागातील गरीब अर्जदारांची यामुळे पुरती दैना झाली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी अभ्यासिकेमध्ये करणारे विद्यार्थी.  

सरकारी नोकऱ्यांसाठीच्या परीक्षा शुल्कावरील जीएसटीमुळे रोजगारइच्छुकांची दैना

शिक्षण पूर्ण करून खेडेगावातून आपल्या नजीकच्या शहरगावांत नोकरीची प्रचंड मोठी आस आणि उमेद घेऊन जायचे. केंद्र सरकार, सिडको, बँकांच्या परीक्षांचे अर्ज भरून त्या त्या ठिकाणी पाठवायचे. त्यानंतर आयुष्य स्थिरस्थावर होण्याची स्वप्ने पाहायचे. पण   या स्वप्नांचा चुराडा जीएसटीमुळे झाला आहे. सध्या  केंद्र सरकार, सिडको, बँकांच्या परीक्षांचे अर्ज भरताना आता १२ टक्के जीएसटी लावण्यात आल्यामुळे पूर्वी ५०० रुपयांना मिळणाऱ्या नोकरीच्या उमेदवारी अर्जावर ९० रुपयांचा कर लागला आहे.  एसटी भाडय़ाची जुळवणीही अवघड असलेल्या दूर्गम भागातील गरीब अर्जदारांची यामुळे पुरती दैना झाली आहे.

सात वर्षांपूर्वी डी.एड. पूर्ण केलेल्या कन्नड तालुक्यातील बरकतपूरच्या योगेश शेषराव मोरे याची एमपीएससीची तयारीही सुरू आहे.  पण पुरेसे शुल्क जवळ नसल्याने स्पर्धा परीक्षांना अर्ज करता आला नाही.  जीएसटीमुळे वाढलेल्या शुल्कामुळे योगेश मोरेसारखे अनेक जण अर्ज भरू शकले नाहीत. बहुतांश परीक्षांचे अर्ज भरण्यासाठी जीएसटीमुळे वाढलेले शुल्क आणायचे कोठून, या नव्या पेचात बेरोजगार तरुणाई अडकली आहे.

योगेश मोरेला सिडकोमध्ये लिपिक पदासाठी अर्ज करायचा होता. जीएसटी ९५ रुपयांनी वाढली. त्या दिवशी नेमके तेवढे पैसे नव्हते. मित्रांकडून उधारीवर घ्यावे म्हटले तर सर्वाची कडकी. त्यामुळे अर्जच केला नाही, असे तो सांगतो. ही परिस्थिती एका विद्यार्थ्यांची या प्रकल्पाच्या मार्गदर्शक मूकध्वनी विद्यालयाच्या शिक्षिका मोनिका कोलासो यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.  सध्या उपलब्ध असणाऱ्या डिजिटल श्रवणयंत्राच्या किंमती काही हजाराच्या पटीत असून त्याच्या देखभालीचा खर्चही परवडणारा नाही. त्यामुळे पेन्सिलवर चालणारे यंत्र योग्य असल्याचा प्रतिसाद मिळाला आहे. या प्रकल्पामध्ये नेहा शेख, खुशबू सरोज, प्रिया गुप्ता, ध्रुव सीट, क्रिश शर्मा हे पाचवीचे विद्यार्थी सहभागी होते.

डिजिटल शिटी

वाहतुकीच्या नियंत्रणासाठी शिटी वाजवावी लागत असल्यामुळे तोंडावर मास्क न घालताच दिवसातले आठ तास वाहनांच्या धुरामध्ये वावरणाऱ्या  वाहतूक पोलीसांची श्वसनाच्या आणि धुळीच्या त्रासापासून सुटका करण्यासाठी डिजिटल शिटीचा शोध ठाण्याच्या सुलोचनादेवी सिंघानिया शाळेच्या विद्यार्थ्यांनी लावला आहे. मनगटी घडय़ाळ्याच्या आकाराची ही शिटी हातात घालून केवळ बटनाच्या साहाय्याने चालविल्यामुळे पोलिसांना तोंडावर मास्क घालून वाहतूक नियंत्रण करणे शक्य होणार आहे. या प्रकल्पामध्ये तेजस्विनी देशमुख, ध्रुव बजाज, समृद्धिनी शाह, आणि सानिका हे पाचवीचे विद्यार्थी सहभागी होते.

जनावरांच्या दुधावर अझोलाजलशैवळाचा प्रयोग

जनावरांच्या दुधाचे उत्पादन आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी अझोला जलशैवाळाचा वापर करण्याचा अभिनव प्रकल्प कोल्हापूरमधील करवीर तालुक्यातील एस.एच.पी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. या प्रकल्पामध्ये मधुबाला मगदुम, प्रतिक्षा पाटील, आकांक्षा पाटील, रेश्मा पाटील, सानिका पाटील या नववीच्या विद्यार्थिनी सहभागी होत्या.

आर्थिक परीक्षा..

  • बँकिंग क्षेत्रातील परीक्षांमध्ये फॉर्म भरताना ऑनलाइन भरावे लागणारे शुल्क अधिक झाले आहे.
  • ठाणे जिल्हा सहकारी बँकेसाठी अर्ज करताना ६५० रुपये शुल्क आणि ११८ रुपये जीएसटी असे ७६८ रुपये भरले. सीनियर बँकिंग असिस्टंट या पदासाठी ६०० रुपये आणि १०८ रुपये जीएसटीचे, असा दर आहे.
  • शिपाई पदाचा अर्ज भरायचा असला तरी आता ४७२ रुपये लागतात. साडेचार हजार रुपयांचा स्वत:चा खर्च आणि वर एक-दोन अर्ज करायचे म्हटले तरी मोठी पंचाईत होऊन जाते.

‘पूर्वी शिक्षणाशी संबंधित सर्व गोष्टींमध्ये कर आकारला जात नसे. आता नव्या कररचनेत व्यावसायिक परीक्षा किंवा अन्य गोष्टींसाठीही कर लावता येतो. त्याप्रमाणे तो आकारला जात आहे. विविध परीक्षांसाठी जीएसटी आकारला जात आहे.

डी. आर. गुप्ता अधीक्षक, जीएसटी कार्यालय- औरंगाबाद

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2018 2:09 am

Web Title: gst effect on unemployed youth
Next Stories
1 विद्यापीठांपुढे पेपरफुटी रोखण्याचे आव्हान
2 आता शिल्पकला यंत्रमानवाच्या हाती!
3 ‘गीत भीमायण’ साकारतेय..!
Just Now!
X