औरंगाबादचे तापमान सध्या ४१ अंशांपर्यंत. दोन दिवसांपासून सूर्य आग ओकतोय. या अवस्थेत घाटीतील जळीत रुग्ण कक्षात दाखल झालेल्या रुग्णांना मात्र मलम आणि पट्टी दोन्हीही बाहेरून विकत आणावे लागत आहे.

जालना जिल्ह्यातून आलेल्या सुनीता खंदारे यांच्या भावाला विदर्भात येणाऱ्या सिंदखेडराजा तालुक्यातील बामण सोयंदो येथून ६५ टक्के जळालेल्या अवस्थेत १२ दिवसांपूर्वी घाटीत दाखल करण्यात आलेले. सुनीता यांचा धर्मा धोंगडे हा एकुलता एक भाऊ. २७-२८ वर्षांचा तरुण. शेतमजुरी करणारा. म्हणजे हातावरचे पोट. वडील नाहीत. घरातील कर्ता सवरता. कसल्यातरी घटनेत ६५ टक्के भाजला. बामण सोयंदो येथून दीडशे ते पावणेदोनशे किलोमीटर अंतर असलेल्या औरंगाबादेतील घाटीत धर्माला दाखल केलेले. जेमतेम परिस्थितीतील या जळीत तरुणाच्या नातेवाइकासह इतरांनाही सध्या बाहेरून मलमपट्टी (बँडेज) आणावी लागते. दिवसाकाठी दोनशे ते तीनशे रुपये खर्च सध्या त्यांना करावा लागतो.

Badlapur, electricity power down, citizens, water supply
बदलापुरात वीज, पाण्यावाचून नागरिकांचे हाल; मध्यरात्री वीज गायब, दिवसाही घामांच्या धारात
condition of primary health centers in state is pathetic beds in rural hospitals are utilized only at 40 percent capacity
राज्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था दयनीय, ग्रामीण रुग्णालयांतील खाटांचा वापर केवळ ४० टक्के क्षमतेनेच
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
cashless health insurance
‘कॅशलेस’ आरोग्य विम्याला डॉक्टरांचा विरोधच! जाणून घ्या कारणे…

मलमपट्टीच्या व्यतिरिक्त जळीत कक्षातील रुग्णांसाठी इतरही फारशा सुविधा नाहीत. येथे ना कूलर आहेत ना वातानुकूलित यंत्रणा. त्यामुळे रुग्णांची तगमग अधिकच होऊ लागली असून नातेवाइकांनाही ती पाहवेनासी झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक डॉक्टर, परिचारिकांना ते थंडावा वाढवण्यासाठी विनंती करतात. भेटायला येणाऱ्या-जाणाऱ्यांनाही रुग्ण कक्षात जाऊन येण्याचा आग्रह धरला जातो. रुग्णांना केवळ पंख्याचीच हवा मिळते. ज्यातून मधून बाहेरून भाजलेल्या रुग्णांची तगमग शमत नाही.

तापमानामुळे जळीत रुग्णांची जी अवस्था होत आहे त्याचे धर्मा धोंगडे हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. जळीत कक्षात सध्या ११ पुरुष तर १२ महिला व ३ बालकांवर उपचार सुरू आहेत. या रुग्णांना घाटीतील सिल्व्हर सल्फाडायझिन हा मलम दिला जात असल्याचे परिचारिकांकडून सांगितले जाते.  पण प्रत्यक्षात रुग्णांचे नातेवाईक, बिटाडेन हा गुलाबी रंगाचा मलम बाहेरून विकत आणावा लागतो. मलमाचा हा एक डबा ११० रुपयांना मिळतो. तर बँडेजसाठी (पट्टी) २२० रुपये लागतात. याशिवाय इंजेक्शन, सिरिंज, असे उपचाराचे साहित्य बाहेरूनच खरेदी करून आणावे, असे सांगतात. रोज येथे दोन ते तीन नातेवाईक थांबलेले असलेले असतात. त्यांचा खर्च भागवण्यासोबतच औषधोपचारासाठीही पदरमोड करावी लागतेय, असा रुग्णांच्या नातेवाइकांचा सूर आहे.

इच्छेनुसार सुचवले जाते

जळीत रुग्णांसाठी बाहेरून औषधे आणा, असे सांगितले जात नाही. रुग्णांना जास्त त्रास होत असेल, तर ते डॉक्टरांना पर्यायी औषधे विचारतात. तेव्हा त्यांना गुलाबी मलम त्यांच्या इच्छेनुसार सुचवला जातो. घाटीत सिल्व्हर सेल्फाडायझिन मलम व पट्टी असे उपलब्ध आहे. कूलरसाठी आम्ही काही कंपन्या, सामाजिक संस्थांना सीएसआर फंड उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. एप्रिलमध्ये घाटीकडूनही तरतूद करण्यात येईल.  – डॉ. सी. बी. म्हस्के, अधीष्ठाता, घाटी.