पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जीवन ज्योती विमा योजनेंतर्गत भारत स्काऊट आणि गाइड संस्थेने निराधार ५० महिलांचा एक कोटी रुपयांचा विमा उतरवून रक्षाबंधनाच्या दिवशी आíथक सुरक्षा कवच दिले आहे. त्यामुळे या योजनेत सहभागी झालेल्या महिलांच्या मुलांचे भवितव्य सुरक्षित राहणार आहे. विमा काढणे ही चांगली गोष्ट नसली तरी काळानुसार ती गरज झाली आहे,  असे  मत खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केले.

बीड भारत स्काऊट आणि गाइड संस्थेचे आयुक्त संतोष मानुरकर यांच्या पुढाकारातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार रक्षाबंधनाच्या दिवशी संस्थेच्या सभागृहात भाजपच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत उपेक्षितांसाठी काम करणाऱ्या वेगवेगळ्या संस्थेमध्ये काम करणाऱ्या निराधार, विधवा आणि गरीब ५० महिलांना जीवनज्योती विमा योजनेच्या हप्त्यांचे वाटप करण्यात आले. एका महिलेला वर्षभरात अपघाती, नसíगक मृत्यू आल्यानंतर दोन लाख रुपये सुरक्षा कवच मिळणार आहे. या वेळी रवींद्र देशमुख, दिनेश िलबेकर, संस्थेचे धनंजय िशदे, राहुल दुबाले, विनय केंडे आदि उपस्थित होते.  आपण शाळेत असताना स्काऊट गाईडमध्ये काम केले आहे. त्यामुळे आज जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार संस्थेचे आयुक्त मानुरकर यांनी विधवा, निराधार महिलांना एक कोटी रुपयांचे विमा सुरक्षा कवच देऊन खऱ्या अर्थाने रक्षाबंधन सार्थ केले आहे. विमा काढणे ही चांगली गोष्ट नसली तरी गरीब कुटुंबातील महिलांना त्यांच्या पाल्यांचे भवितव्य सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक बाब बनली आहे. भावाने बहिणीचे लाड पुरवायचे असले तरी बहिणीकडेही सेवेचे व्रत असल्याने स्काऊट गाइड संस्थेला कायम सहकार्य राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.  या वेळी आयुक्त संतोष मानुरकर यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती देऊन आर्वी येथील शांतीवन प्रकल्प, ब्रह्मनाथ येळंब येथील सेवाश्रम, पाली येथील आनंदवन आणि मानवी हक्क अभियानातील गरीब महिलांना आपलेही कोणीतरी आहे या भावनेचा आधार देण्यासाठी हा उपक्रम राबवल्याचे सांगितले.