20 September 2020

News Flash

औरंगाबाद पालिकेत जपानी पाहुण्याने केली ‘चाय पे चर्चा’

चहात खूपच गोडवा

जपानच्या नागरिकांने औरंगाबाद पालिकेला भेट दिली

राज्यातील औरंगाबाद शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्यामुळे या शहरात देशासह परदेशातून अनेक नागरिक पर्यटनासाठी येत असतात. नुकतेच या शहरात एका जपानी पाहुण्याने भेट दिली. विशेष म्हणजे औरंगाबादच्या दर्शनासाठी आलेल्या या पाहुण्याने पालिकेला भेट दिल्याचे पाहायला मिळाले. औरंगाबाद महापालिकेला शुक्रवारी जपानी पाहुण्याने भेट दिली. यावेळी त्याने जपानी भाषेच्या ट्युनिंगमध्ये ‘जय महाराष्ट्र..मी मसायहिरो याबूथा’ अशी ओळख करून देत मराठी बाणा दाखवून दिला. या शैलीमुळे त्याने उपस्थितांची मने जिंकली.

नांदेड येथील चैतन्य भांडारे जपानमध्ये राहतात. त्यामुळे चैतन्य आणि मसायहिरो याबूथा यांची मैत्री आहे. औरंगाबाद या ऐतिहासिक शहराच्या दर्शनासाठी आलेल्या जपानी पाहुण्यासह चैतन्य हे देखील उपस्थित होते. यावेळी चैतन्य यांनी महापौर आणि आयुक्त यांना ‘द लीग ऑफ हिस्टोरिकल सिटी’ मध्ये सहभागी होण्याची विनंती केली. भारतातून वाराणशी या एकमेव शहराचा या लीगमध्ये समावेश झाला आहे.

या भेटीदरम्यान काही औपचारिक गप्पा झाल्या. यावेळी जपानच्या पाहुण्याने भारतातील चहावर चर्चा केली. भारतात चहा हे लोकप्रिय पेय आहे.  तो खूपच गोड असतो, असे त्याने म्हटले. तसेच जपानचे पेय पिण्याचे आवाहन देखील त्याने भारतीयांना केले. भारतामध्ये ज्याप्रमाणे चहाची गोडी आहे तशी गोड जपानमधील ‘माचाव’ या पेयाची आहे. जपानी पेयाविषयी याबूथा म्हणाले की, ‘माचाव’ प्यायल्यानंतर फायदा होतो. त्यासाठी त्याने जागतिक आरोग्य संघटनेचा दाखल दिला. ते म्हणाले की, जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीत जपानमधील नागरिकांचे आयुर्मान अधिक आहे. तेथील लोकांच जीवनमान ८२ वर्षे आहे. या यादीमध्ये भारत १२५ व्या क्रमांकावर आहे. भारतातील नागरिकांचे सरासरी जीवनमान ६८ असल्याचेही त्यांने यावेळी सांगितले. यावेळी महापौर आणि आयुक्तांना मसायहिरो यांनी ‘माचाव’ हे जपानमधील लोकप्रिय पेय स्वत:च्या हाताने तयार करून दिले. शहराच्याभेटी दरम्यान रस्ते अधिक स्वच्छ व्हायला हवेत, असे मत व्यक्त केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2017 3:46 pm

Web Title: japanese citizens visit aurangabad municipal corporation
Next Stories
1 .. आणि व्हाट्सअॅपमुळे बालविवाह रोखला
2 वैजापुरच्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत लागलेली भीषण आग आटोक्यात
3 शौचालय बांधकामाचे आकडे फुगले
Just Now!
X