News Flash

एटीएमचा पासवर्ड देण्यास नकार, परभणीत तरुणाची हत्या

ताडकळसमधील पिप्री येथे जेसीबी चालकाची हत्या केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास करत दोन जणांना अटक केली आहे.

एटीएमचा पासवर्ड देण्यास नकार, परभणीत तरुणाची हत्या
प्रतिकात्मक छायाचित्र

परभणीत एटीएमचा पासवर्ड न दिल्याच्या कारणावरुन एका तरुणाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. संतोष सांगळे असे या मृत तरुणाचे नाव असून या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. तर त्यांच्या तिसऱ्या साथीदाराचा शोध सुरू आहे.

ताडकळसमधील पिप्री येथे जेसीबी चालकाची हत्या केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास करत दोन जणांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय उर्फ अजिंक्य जगताप, रामेश्वर सुभाष देवनाळे आणि वैभव नंदू मानवतकर हे तिघे आरोपी चितेगाव येथील कंपनीत काम करतात. औरंगाबादवरुन निघाल्यानंतर आधी त्यांनी बजाज चौकात एका व्यक्तीला चाकूचा धाक दाखवून लुबाडले. तिथून जालना औद्योगिक वसाहतीजवळही एका दुचाकीस्वाराला लुबाडले. यानंतर ते परभणीतील पिप्री येथे पोहोचले. २० नोव्हेंबर रोजी त्यांनी जेसीबी चालक संतोष सांगळे व त्याचा सहकारी उमेश रावत यांना गाठले. त्यांनी संतोषकडे एटीएमचा पासवर्ड मागितला. मात्र, त्याने नकार दिल्याने संतोषची हत्या केल्याची कबुली चोरट्यांनी दिली आहे.यातील अजिंक्य जगताप हा तरुण अद्याप फरार असून उर्वरित दोघांना अटक करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2018 3:42 pm

Web Title: jcb driver killed by robbers after refused to share atm password in parbhani
Next Stories
1 मराठवाडय़ात दुष्काळातली ‘साखरपेरणी’!
2 ‘उसाच्या पाण्याचे व्यवस्थापन हाच दुष्काळावर उपाय’
3 क्षुल्लक कारणावरुन झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू
Just Now!
X