03 March 2021

News Flash

औरंगाबदेत ‘जेसीबी’ चोरांना बेड्या

औरंगाबाद जिल्ह्यातील माळीवाडा येथून ७ लाख रुपये किमतीचा ‘जेसीबी’ चोरणाऱ्या दोन चोरट्यांना गुन्हेशाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने अटक केली. त्यांच्या ताब्यातून चोरीला गेलेला ‘जेसीबी’ पोलिसांनी जप्त

चोरीला गेलेला 'जेसीबी' पोलिसांनी जप्त केला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील माळीवाडा येथून ७ लाख रुपये किमतीचा ‘जेसीबी’ चोरणाऱ्या दोन चोरट्यांना गुन्हेशाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने अटक केली. त्यांच्या ताब्यातून चोरीला गेलेला ‘जेसीबी’ पोलिसांनी जप्त केला आहे. दौलताबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या माळीवाडा येथील रहिवासी गणेश मुळे यांचा ( एमएच २० सीएच ६८३७) जेसीबी ८ सप्टेंबरला चोरी झाला होता. याप्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

गुन्हे शाखेच्या वतीने महामार्गवरील तसेच गावातील सीसीटीव्ही तपासण्यात आले. मंगळवारी या प्रकरणात पोलिसांना काही धागेदोरे सापडले. राजेंद्र लक्ष्मण गुळवे आणि शंकर उत्तम गायकवाड हे दोघेजण जेसीबी घेऊन गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी शंकरला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखवताच शंकरने जेसीबी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी संशयित आरोपी शंकर आणि राजेंद्र दोघांना अटक केली असून जेसीबी जप्त करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2017 5:24 pm

Web Title: jcb thieves two man arrested in aurangabad
Next Stories
1 औरंगाबादमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
2 रस्त्यांकडे शासनाचे लक्ष कसे नाही?
3 EXCLUSIVE : भगवानगड सुरक्षित ठेवण्यासाठी राजकारण बाजूला, नामदेव शास्त्रींची भूमिका
Just Now!
X