News Flash

जीप पुलाखाली पडल्याने अपघात; ३ ठार १९ जखमी वार्ताहर, उस्मानाबाद जीप पुलाखाली पडल्याने अपघात; ३ ठार १९ जखमी

देवीदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची पीकअप जीप पुलावरून खाली पडून तीन जण ठार तर १९ जण जखमी झाल्याची घटना रविवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास loks घडली.

तीर्थक्षेत्र तुळजापूरकडे देवीदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची पीकअप जीप पुलावरून खाली पडून तीन जण ठार तर १९ जण जखमी झाल्याची घटना रविवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास भूम तालुक्यातील आंतरवलीनजीक घडली. जखमींना नगर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. हरूबाई श्रीरंग खेडके या महिलेसह साहेबराव अश्रू िशदे व विठोबा यशवंत मदने अशी मृतांची नावे आहेत. सर्वजण नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील रहिवाशी आहेत.
श्रीगोंदा तालुक्यातील कामठी, राळेगण, मांडवगण या तीन गावातील २२ भाविक तुळजाभवानीच्या दर्शनासाठी शनिवारी सायंकाळी निघाले होते. भाडय़ाने केलेली पीकअप जीप (क्र. एमएच १६, एझेड ४११८) रविवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास भूम तालुक्यातील आंतरवलीनजीक आल्यानंतर चालकाला झोप येत होती. खर्डा गावानजीकच्या पुलावर जीप आल्यानंतर चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटल्याने जवळपास १५ ते २० फूट उंचीच्या पुलावरून ही खाली आदळली. जीपमधील काही भाविक झोपलेले होते. १९ भाविक जखमी झाले. अपघातानंतर खर्डा येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन अंभी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर रुग्णवाहिका बोलावून सर्व जखमींना नगर येथील रुग्णालयात उपचारांसाठी हलविण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2016 1:20 am

Web Title: jeep accident 3 death
Next Stories
1 तर्कतीर्थाच्या मुलाच्या आडून बाबा भांड यांचे समर्थन!
2 पावणेदोनशे ग्रामपंचायतींमध्ये टीसीएलविना शुद्ध पाणी नाही
3 हिंगोलीत शासकीय विश्रामगृहास आग लागून साहित्य जळून खाक
Just Now!
X