केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी घटस्पोटासाठी कौटंबीक न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. सासरे आणि जावई यांचा वाद अनेकदा चव्हाट्यावर आला होता. जाधव यांनी केलेल्या घटस्फोटाच्या अर्जवरुन आता हा वाद विकोपाला गेल्याचं दिसतेय. मला रावसाहेब दानवे आणि मुलगी संजना यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचाही आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. सोशल मीडियावर त्यांनी एक व्हिडीओ प्रसारित करुन दानवे यांच्यावर पुन्हा आरोप केले आहेत. दरम्यान, हा व्हिडीओ त्यांनी डिलीट केला. मात्र, तोपर्यंत हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे.

रावसाहेब दानवे यांची कन्या संजना यांच्यासबोत हर्षवर्धन जाधव यांचा विवाह झाला होता. त्यांना एक अपत्य आहे. हर्षवर्धन जाधव, संजना जाधव, आई तेजस्विनी रायभान जाधव आणि मुलगा असे चार लोकांचं जाधव कुटुंब समर्थनगर (औरंगाबाद) येथे राहतात. जाधव कुटुंबियातील कुरबुरींची अनेक वेळा चर्चा होते. मात्र आता हा वाद विकोपाला गेला असून हर्षवर्धन जाधव यांनी घटस्फोटासाठी कोर्टात धाव घेतली आहे.

Former RBI Governor D Subbarao
विकासाचे गुलाबी चित्र रंगवण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेवर यूपीए सरकारचा दबाव! सुब्बाराव यांचा मुखर्जी, चिदम्बरम यांच्यावर आरोप
dewendra fadanvis
आमचा प्रवक्ताही चर्चेत पाणी पाजेल…; फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना…
girish mahajan statement on bjp mp unmesh patil
खासदार उन्मेश पाटील यांना चुकीची जाणीव होईल; गिरीश महाजन यांचा सूचक इशारा
friendly fight nashik
नाशिकमध्येही मैत्रीपूर्ण लढत करावी – काँग्रेसची मागणी

हर्षवर्धन जाधव यांनी राजकारणातून निवृत्ती घेत आपल्या पत्नीच्या हाती राजकीय सूत्र सोपवत असल्याचे काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. हर्षवर्धन जाधव दोन वेळा कन्नडचे आमदार राहिले आहेत. रावसाहेब दानवे आणि चंद्रकांत खैरे दोघे मिळून आपल्याला वेडे ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला होता. “रावसाहेब दानवे यांच्यामुळे माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली. त्यांनी माझ्याविरोधात अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करून घेतला. त्यांच्या त्रासामुळे मी अंतूर किल्ल्यावर आत्महत्या करण्यासाठी गेलो होतो”, असे गंभीर आरोपही हर्षवर्धन जाधव यांनी केले होते.