29 January 2020

News Flash

‘संघटनमंत्र्यांच्या माहितीनंतरच लातूरला रेल्वेने पाणी चाचपणी’

दुष्काळी मराठवाडय़ातील लातूर शहराला रेल्वेने पाणी देण्याचे केवळ आठवडय़ापूर्वी ठरले आहे. रेल्वेने पाणी देता येऊ शकते का, याच्या चाचपणीला सुरुवात झाली.

दुष्काळी मराठवाडय़ातील लातूर शहराला रेल्वेने पाणी देण्याचे केवळ आठवडय़ापूर्वी ठरले आहे. पूर्वी दिलेला प्रस्ताव अंमलबजावणीत येणार नाही, असेच चित्र होते. मात्र, मिरज येथील भाजपचे संघटनमंत्री मकरंद देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनंतर पुन्हा रेल्वेने पाणी देता येऊ शकते का, याच्या चाचपणीला सुरुवात झाली.
नाशिक येथे भाजपच्या बठकीत मिरजला वारणा खोऱ्यात १६ घनमीटर पाणी व रेल्वेकडे शुद्धीकरण व्यवस्था असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आले. त्यानंतर तीन दिवसांत यंत्रणा पुन्हा हलली. मकरंद देशपांडे यांनी ही माहिती दिली नसती तर लातूरला रेल्वेने पाणी ही घोषणा हवेतच विरली असती.
नाशिक येथील भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बठकीस गेलेल्या मकरंद देशपांडे यांनी मराठवाडय़ातील पाणीटंचाईवर मिरजचा पर्याय वापरावा, अशी सूचना केली. रेल्वेसाठी पाणी आरक्षित करण्यास त्यांनी पूर्वी पाठपुरावा केला होता. रेल्वेकडून हे पाणी फारसे वापरले जात नव्हते. मिरज-पंढरपूर मार्ग आता १५ एप्रिलपर्यंत रेल्वे येण्यासाठी त्याची साफसफाईचे काम राजस्थानमधील कोटा येथे सुरू आहे. ही रेल्वे रविवापर्यंत मिरज येथे येईल. त्यांनतर लातूर येथील पाणी साठवणुकीच्या व्यवस्था पूर्ण झाल्यानंतर रेल्वेने पाणीपुरवठा होऊ शकणार आहे.
मकरंद देशपांडे म्हणाले की, या सूचनेनंतर पुन्हा राजकारण सुरू झाले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीकडून रेल्वे अडविण्याचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, पुरेसे पाणी असल्याने मराठवाडय़ाला पाणी देण्यात कोणतीही अडचण नाही.

First Published on April 9, 2016 1:32 am

Web Title: latur water railway
टॅग Railway
Next Stories
1 अंबाजोगाई पीपल्स बँकेला १ कोटी ३८ लाखांचा नफा
2 भाजपच्या वर्धापनदिनाकडे नव्या पदाधिकाऱ्यांची पाठ
3 वर्ष नवे, प्रश्न जुने!
X