News Flash

बंधाऱ्यांत चर खोदून लातूरकरांना पाणी देण्यास मंजुरी

लातूर शहराच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आता मांजरा व साई बंधाऱ्यात चर खोदण्यास मंत्रिमंडळ उपसमितीने मंजुरी दिली आहे.

लातूर शहराच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आता मांजरा व साई बंधाऱ्यात चर खोदण्यास मंत्रिमंडळ उपसमितीने मंजुरी दिली आहे. साई बंधाऱ्यासाठी ५० लाख, तर मांजरा पात्रात ३५ लाख रुपये या कामासाठी मंजूर करण्यात आले आहेत. या बरोबरच मातोळा येथील दहा खेडी पाणीपुरवठा योजनेसाठी ७९.५६ लाख रुपये मंजूर करण्यात आले असले, तरी थकीत वीज देयक देण्यास मात्र मनाई करण्यात आली आहे.
लातूर शहर संपूर्णत: टँकरवर आल्याने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आता पुन्हा जोर लावला जात आहे. मातोळा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून बेलकुंडपर्यंत पाणी आणायचे व तेथून टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक ती तरतूद करण्यात आली आहे. या सर्व योजनांसाठी १० टक्के लोकवर्गणीचीही अट टाकण्यात आली आहे. पानचिंचोली पाणीपुरवठा योजनेसाठी ४ कोटी देण्यात येणार असून केवळ टँकरसाठी १२ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी देण्यात आला. शहरात १२० िवधनविहिरी घेऊन त्यावर पॉवरपंप बसविणे तसेच ३० हातपंप घेण्यासाठी २ कोटी ७८ लाख रुपयांची तरतूद करण्यास मंत्रिमंडळ उपसमितीने परवानगी दिली आहे.
केवळ लातूरच नव्हे, तर बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमध्येही पाणीटंचाई अधिक असल्याने येथे तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनेसाठी २ कोटी ३० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. केज, कळंब, उदगीर येथेही पाणीटंचाईची तीव्रता अधिक आहे. येत्या काळात टँकरचा फेरा थेट ३० व ३५ किलोमीटपर्यंत लांबणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2016 1:30 am

Web Title: laturkars water sanctioned
टॅग : Sanctioned
Next Stories
1 पोलीस अधिकाऱ्यासह दोघांना चौकीत घुसून जमावाची मारहाण
2 पालमचे बीडीओ म्हणतात : ‘मला निलंबित करा’!
3 वाळू तस्करांच्या हल्ल्यात पथकातील तलाठी जखमी
Just Now!
X