==मराठवाडा साहित्य परिषदेचा या वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार डॉ. नागनाथ कोत्तापल्ले व परिषदेचे १५ वर्षांपासून कोषाध्यक्षपद सांभाळणाऱ्या प्राचार्य प्रताप बोराडे यांना जाहीर करण्यात आला आहे. मसापच्या उभारणीत दोघांच्या कामांची नोंद आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांची  निवड केली असल्याचे मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी जाहीर केले आहे.

मराठवाडा साहित्य परिषदेच्या उभारणीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्यांमध्ये प्राचार्य प्रताप बोराडे यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. १५ वर्षांपासून साहित्य परिषदेच्या जागेवर अतिक्रमण होऊ नये म्हणून कुंपण घालणे, यशवंतराव चव्हाण नाटय़गृहाची पायाभरणी करून खुले नाटय़गृह उभे करणे, अनंत भालेराव इमारत आदी कामांत त्यांनी योगदान दिले. बोराडे हे अभियांत्रिकीचे दुहेरी पदवीधर असून ते २० वर्षांहून अधिक काळ जवाहरलाल अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य असल्याने त्यांना विविध व्यावसायिक संस्थांशी संपर्क आणि संबंध होता.

piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी
chandrachud
‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ सोहळा; सरन्यायाधीश चंद्रचूड प्रमुख अतिथि, विविध क्षेत्रांतील १८ प्रज्ञावंतांचा सन्मान
religious activities by bjp workers for victory of lok sabha candidate sudhir mungantwar
चंद्रपूर : विजयासाठी धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून देवालाच साकडे!
Cooking Competition in Mumbai on the occasion of Loksatta Purnabraham publication Mumbai
‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ प्रकाशनानिमित्त आज मुंबईत पाककला स्पर्धा

कोत्तापल्ले विद्यार्थिदशेपासून मराठवाडा साहित्य परिषदेशी जोडले गेले आहेत. परिषदेच्या साहित्य व्यवहारात ते २५ वर्षे कार्यरत आहेत. ‘प्रतिष्ठान’ या नियतकालिकाचे ते दीर्घकाळ संपादक होते. परिषदेच्या पडत्या काळात डॉ. सुधीर रसाळ, प्राचार्य कौतिकराव ठाले यांच्या समवेत त्यांनी काम केले. त्यांचे तीन कविता संग्रह, आठ कथासंग्रह, तीन कादंबऱ्या, दहा समीक्षाग्रंथ व  वैचारिक आणि ललित लेखन असे ३५ हून अधिक ग्रंथ प्रसिद्ध आहेत. दोघांना जीवनगौरव पुरस्कार देण्याचे गुरुवारी घेण्यात आलेल्या बैठकीत ठरविण्यात आल्याचे कौतिकराव ठाले पाटील यांनी सांगितले.