22 February 2020

News Flash

नांदेडात व्यापाऱ्यास २४ लाखांना लुटले

ऐन दिवाळीच्या धामधुमीत भुसार व्यापाऱ्याला शस्त्राचा धाक दाखवून २४ लाख रुपयांना लुबाडण्यात आले.

ऐन दिवाळीच्या धामधुमीत भुसार व्यापाऱ्याला शस्त्राचा धाक दाखवून २४ लाख रुपयांना लुबाडण्यात आले. नांदेडपासून २० किलोमीटर अंतरावर पाटनूर शिवारात शनिवारी रात्री हा प्रकार घडला. मात्र, हा प्रकार कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला, यावरच तपासाची चक्रे थांबली होती.
तामसा येथील भुसार व्यापारी गंगाधर पाटील गोजेगावकर शनिवारी रात्री स्वत:च्या इंडिगो मोटारीने (एमएच ३१ सीएम ५८६८) हदगावला निघाले होते. नेहमीप्रमाणे अर्धापूर-तामसामाग्रे हदगावला जाताना रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांची मोटार पाटनूर घाटात पाठलाग करणाऱ्या स्काíपओने (एपी १ १७६३) अडवली. स्काíपओतून तोंडाला रुमाल बांधलेले ७-८ तरुण उतरले. चाकू, लोखंडी सळई, टॉमीसारख्या शस्त्रांचा धाक दाखवत त्यांनी गोजेगावकर यांना धक्काबुक्की केली. जीवाच्या भीतीने गोजेगावकर यांनी कोणताही प्रतिकार न करता जवळील रोकड दरोडेखोरांच्या स्वाधीन केली. अवघ्या काही क्षणांत ही लुटमार झाल्यानंतर दरोडेखोर पसार झाले. गोजेगावकर यांनी तामसा पोलिसांना या बाबत माहिती दिली. तामसा पोलिसांचे पथक घटनास्थळी धावले खरे, पण तोपर्यंत दरोडेखोर पसार झाले होते. पाटनूरचा घाट अर्धापूर, तामसा या दोन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विभागला गेला आहे. घटना कुठे घडली व कोणत्या पोलीस ठाण्याची हद्द यावरून उशिरापर्यंत वाद सुरू होता. घटना घडून २४ तास उलटले, तरीही आरोपींचे धागेदोरे पोलिसांना मिळू शकले नव्हते.

First Published on November 9, 2015 1:20 am

Web Title: loot to traders in nanded
Next Stories
1 अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पित्यास अटक
2 पाणीप्रश्नी सर्वपक्षीय मोर्चा
3 सर्व संस्था विदर्भाला मग मराठवाडय़ाला काय?- खासदार खैरे