21 October 2020

News Flash

राज्यात रक्ताचा पुन्हा तुटवडा!

मध्यंतरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्र्यांनी आवाहन केल्यानंतर परिस्थिती सुधारली होती.

सुहास सरदेशमुख, औरंगाबाद

करोना भीतीमुळे तसेच राज्यातील महाविद्यालये बंद असल्याने रक्त संकलनाचे काम थंडावले आहे. परिणामी राज्यात सर्वत्र रक्त तुटवडा जाणवत आहे. पण रक्त मिळतच नाही, असे चित्र नाही.  दात्याला बोलावून रक्ताची गरज भागविण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत. शुक्रवापर्यंत राज्यातील विविध रक्तपेढय़ांमध्ये १५ हजार २२९ रक्त पिशव्या होत्या. विविध गटातील रक्त आणि रक्तद्रव्य, प्लेटलेट याची उपलब्धता एकत्रितपणे दिसत असली तरी अनेक रक्तपेढय़ांमध्ये तुटवडा जाणवत आहे. मध्यंतरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्र्यांनी आवाहन केल्यानंतर परिस्थिती सुधारली होती. मात्र, तुटवडा भासू लागला आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवाच्या काळात अधिक शिबिरे घेतली जावीत असे आवाहन  रक्त परिषदेचे संचालक अरुण थोरात यांनी केले आहे.

टाळेबंदीमध्ये अनेकांनी त्यांच्या नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या होत्या. त्या आता सुरू झाल्या आहेत. त्यामुळे उपचारा दरम्यान रक्त देण्याची गरज वाढू लागली आहे. असे असले तरी कोविडपूर्व रक्तपेढीत येऊन रक्तदान करणाऱ्यांचे प्रमाण घटले आहे. अर्धा ते पाऊण तासाच्या फरकाचे केवळ चार किंवा पाच जणांना बोलावून रक्तदान करवून घेतले जात आहे. रुग्णालयात आणि रक्तपेढय़ांमध्ये घेतल्या जाणाऱ्या काळजीचे छायाचित्रण करून त्याचा प्रसारही केला जात आहे. मात्र, पुरेसा रक्तपुरवठा आहे असे चित्र दिसून येत नाही असे औरंगाबाद येथील दत्ताजी भाले रक्तेपढीच्या मंजूषा कुलकर्णी म्हणाल्या. राज्यभर सर्वत्र रक्त पुरवठा कमी पडत असल्याचे दिसून येत असून गरजेच्या वेळी त्याची अडचण होऊ शकते. राज्यातील रक्त तुटवडय़ाची गरज लक्षात घेता शिबिरे वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे संचालक अरुण थोरात यांनी सांगितले. मराठवाडय़ात औरंगाबाद, जालना, हिंगोली येथेही अडचणी असल्याचे प्रादेशिक अधिकारी सविता सोनवणे यांनी सांगितले. महाविद्यालये आणि उद्योगातील कामगार रक्तदानासाठी पुढे येत. उद्योगही पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने कामगार रक्तदान करण्याइतपत मानसिकरीत्या तयार झालेला नाही. तसेच महाविद्यालये बंद असल्याने अडचणी वाढल्या आहेत. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आता या साठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. रक्त पिशव्या आणि रक्त विघटनासाठी वा तपासण्यासाठी लागणारी सारी रसायने मात्र वेळेवर व मुबलक प्रमाणात मिळत असल्याचे सांगण्यात येते. रक्तदानाची राज्यभर गरज असल्याचे आवर्जून सांगण्यात येत आहे.

शिबिरांना अत्यल्प प्रतिसाद

रक्तपेढय़ांकडून शिबिर अयोजित होते. मात्र, त्यालाही पुरेसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे शिबिरसंख्याही घटली आहे. एखाद्या रक्तपेढीकडून ५० कोविडपूर्व स्थितीमध्ये घेतली जात होती आता ३६ वर आली आहे. रक्ताची गरज भागते पण त्याची उपलब्धता पुरेशी नाही. त्यामुळे एखाद्या रुग्णास सकाळच्या सत्रात रक्त द्यायचे असेल तर ते संध्याकाळपर्यंत मिळते. अगदी मिळतच नाही असे नाही . पण त्याचा पुरेसा साठा मात्र उपलब्ध नाही, असे सांगण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2020 12:04 am

Web Title: maharashtra faces shortage of blood supply due to covid 19 zws 70
Next Stories
1 मनोरंजन क्षेत्रावरील निर्बंध कमी करण्यासाठी आंदोलन
2 गरिबांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शन कमी किमतीमध्ये
3 खेळाडूंसाठी आजपासून मैदाने खुली
Just Now!
X