22 January 2018

News Flash

औरंगाबाद-जालना रोडवर भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

लाडगाव जवळ झाला अपघात

औरंगाबाद | Updated: October 11, 2017 3:38 PM

प्रतिनिधीक छायाचित्र

औरंगाबाद-जालना रोडवरील लाडगाव जवळ ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात बिडकीन येथील अजमोद्दीन नइमोद्दीन इनामदार ( वय ४०) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. करमाडा पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली असून दोन्ही वाहनं पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.

बिडकीन येथील रहिवासी अजमोद्दीन नाइमोद्दीन इनामदार त्यांच्या दुचाकीवरून करमाड येथे कामानिमित्त जात होते. लाडगाव जवळ दुचाकीवरून जात असताना भरधाव वेगात येणाऱ्या एका ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात इनामदार हे गंभीर जखमी झाले होते. ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनंतर करमाड पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत जखमी इनामदार यांना रुग्णालयात दाखल केलं. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी इनामदार यांना मृत घोषित केले. या अपघात प्रकरणी करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन्ही वाहने ताब्यात घेतली आहेत.

First Published on October 11, 2017 3:38 pm

Web Title: man death truck two wheeler accident on aurangabad jalna road
  1. No Comments.