News Flash

छेडछाडीमुळे मुलीने शाळेला जाणे सोडले

गांधीनगर भागात राहणाऱ्या १५वर्षीय मुलीने छेडछाड होते म्हणून २२ डिसेंबरपासून शाळेत जाणेच सोडून दिले आहे.

नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला छेडछाडीमुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. गांधीनगर भागात राहणाऱ्या १५वर्षीय मुलीने छेडछाड होते म्हणून २२ डिसेंबरपासून शाळेत जाणेच सोडून दिले आहे.
खाराकुँआ भागातील शाळेत शिकणाऱ्या या मुलीच्या आईच्या मोबाइलवर छेड काढणाऱ्या मुलाचा दूरध्वनी आला. तिने ही बाब पालकांना सांगितली. मुलीच्या वडिलांनी सिटी चौक पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत छेडछाड प्रकरणाबाबत शाळेच्या व्यवस्थापनाला काही प्रश्न विचारले.
शहरातील सर्वात जुन्या शाळेत नववीत शिकणाऱ्या मुलीची सनी नावाचा मुलगा छेड काढत होता. त्याचे पूर्ण समजू शकले नाही. काही दिवसांपूर्वी वर्गाबाहेर उभे राहून एक मुलगा टपोरीगिरी करीत होता. एके दिवशी वर्गात येऊनही त्याने या मुलीशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे घाबरून जाऊन २२ डिसेंबरपासून मुलीने शाळेत जाणे सोडून दिले. पालकांनी विचारल्यानंतर तिने शाळेत न जाण्याची वेगवेगळी कारणे सांगितली. पोलीस निरीक्षक एन. एस. कोळे यांनी, या तक्रारीच्या अनुषंगाने शालेय व्यवस्थापनाला काही प्रश्न विचारले आहेत आणि लवकरच संशयित तरुणाला ताब्यात घेतले जाईल, असे सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2016 1:57 am

Web Title: manipulate girl stops school
Next Stories
1 ‘बौद्ध धर्म लोकशाहीला सुसंगत आणि पूरक’- प्रा. सदानंद मोरे
2 वृद्ध महिलेचा गळा चिरून खून
3 दिल्ली विद्यापीठातील निवडणुकीत भाजपचे निर्विवाद वर्चस्व
Just Now!
X