मराठवाडा जनता विकास परिषदेत अध्यक्ष आणि सदस्यांमध्ये मतभेद

स्वतंत्र मराठवाडय़ासाठी जनाधार नसताना चर्चा घडवून आणण्याच्या उद्दिष्टाने आयोजित मराठवाडा मुक्ती मोर्चाचा कार्यक्रम गुरुवारी शिवसेनेने Shiv Sena उधळला. त्यानंतर या कार्यक्रमात मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष या नात्याने सहभागी होऊ इच्छिणाऱ्या अ‍ॅड. प्रदीप देशमुख यांच्या भूमिकेला विरोध केला जात आहे. मराठवाडा जनता विकास परिषदेचे माजी अध्यक्ष व्यंकटेश काब्दे यांनी अ‍ॅड. देशमुख यांची भूमिका संघटनेची अधिकृत भूमिका नाही, असे ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. गेल्या शनिवारी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या बैठकीतही या प्रश्नावरून बरीच खडाजंगी झाली होती. मराठवाडा स्वतंत्र व्हावा की न व्हावा यासाठीचा कोणताही अभ्यास न करता अशी मागणी करणे चुकीचे ठरेल, असे स्वातंत्र्यसैनिक भगवानराव देशपांडे यांनीही म्हटले आहे.

केवळ पश्चिम महाराष्ट्राने अन्याय केला म्हणून आमचा प्रांत स्वतंत्र करा, असे म्हणणे चुकीचे ठरेल, अशी प्रतिक्रिया मराठवाडय़ातून उमटू लागली आहे. स्वतंत्र विदर्भाचे ढोल भाजप नेत्यांकडून अधूनमधून बडवले जात असतानाही मराठवाडय़ातील भाजपचे नेतेही मराठवाडा स्वतंत्र व्हावा, या भूमिकेचे नाहीत. शिवसेनेने स्वतंत्र मराठवाडय़ाच्या विरोधात भूमिका घेत श्रीहरी अणे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम उधळला. शिवाय त्यांच्या गाडीवर दगडफेकही केली. त्यामुळे राजकीय पक्षांकडून स्वतंत्र मराठवाडय़ाची मागणी होण्याची शक्यता कमीच आहे. जनाधार नसताना केवळ चर्चा घडविण्याच्या उद्देशाने अणे यांचा कार्यक्रम घडवून आणण्यात आला होता, असे आता पुढे येऊ लागले आहे. या निमित्ताने मराठवाडय़ाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या मराठवाडा जनता विकास परिषदेत मात्र अध्यक्ष आणि सदस्य यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. शनिवारी या संघटनेच्या बैठकीत अ‍ॅड. प्रदीप देशमुख यांच्या भूमिकेला विरोध करत स्वतंत्र मराठवाडय़ाची भूमिका घ्यायची असेल तर संघटनेचे नाव वापरू नका, असे सांगण्यात आले होते. थोर स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ यांनीदेखील स्वतंत्र मराठवाडय़ाची भूमिका कधीच मांडली नव्हती. विकासातील हिस्सा मिळावा म्हणून केलेल्या संघर्षांनंतर वैधानिक विकास मंडळे स्थापन झाली. त्याला छेद देणारी भूमिका मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष मांडत आहेत. आर्थिकदृष्टय़ा मराठवाडा स्वतंत्र होऊ शकतो का, याचा अभ्यास न करता केली जाणारी मांडणी चुकीची असल्याचे स्वातंत्र्यसैनिक भगवानराव देशपांडे म्हणाले.

केवळ पश्चिम महाराष्ट्राने अन्याय केला म्हणून आमचा प्रांत स्वतंत्र करा, असे म्हणणे चुकीचे ठरेल, अशी प्रतिक्रिया मराठवाडय़ातून उमटू लागली आहे. स्वतंत्र विदर्भाचे ढोल भाजप नेत्यांकडून अधूनमधून बडवले जात असतानाही मराठवाडय़ातील भाजपचे नेतेही मराठवाडा स्वतंत्र व्हावा, या भूमिकेचे नाहीत. शिवसेनेने स्वतंत्र मराठवाडय़ाच्या विरोधात भूमिका घेत श्रीहरी अणे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम उधळला.